छोट्या पडद्यावरील सर्वच कार्यक्रम हे कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. यातील एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. ही मालिका नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच मिलिंद गवळींनी त्यांच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी त्यांची पत्नी दिपा गवळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यात त्यांनी एक पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये संधी कशी मिळाली? शिवाली परबने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “आगरी भाषा…”
मिलिंद गवळी यांची पोस्ट
“दिपा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुला सुख ,समृद्धी ,आरोग्य, यश मिळो. सदैव आनंदी रहा, खुश रहा , नेहमी सारखं सतत हसत रहा. अशी ईश्वरचरणी प्रार्थना, आम्हाला अशीच inspire करत रहा, तुझी चिकाटी, जिद्द, energy infectious आहे. अशीच रहा ! आणि नशीबवान आहेस तू , तुला दोन वाढदिवस साजरे करायला मिळतात, वर्षानुवर्ष वाढदिवस ९ नऊ मे May या तारखेला साजरा केला जातो,
खरं तिचा जन्म १० मे चा आहे. पण मग का तिचा वाढदिवस एक दिवस आधी ९ लाल केला जातो, कारण तिच्या मोठ्या बहिणीचा म्हणजे रंजूताई चा वाढदिवस नऊ मे ला असतो, मग मोठ्या बहिणीबरोबर या शेंडेफळाचा म्हणजेच दिपाचा पण वाढदिवस त्याच दिवशी साजरा व्हायचा, आणि वर्षां वर्ष हे असंच घडत होतं, आणि मग ती स्वतः विसरून गेली होती की तिचा जन्म दहा मे चा आहे.
म्हणून यावर्षी मी मुद्दामून तिच्या जन्मदिवशी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे. एकाच दिवशी दोघांच celebration करण्या पेक्षा दोन वेगवेगळे सेलिब्रेशनस करायला काय हरकत आहे. किंवा दोन्ही दिवशी ते साजरे करूया.
खूप श्या लोकांच्या जन्म तारखेचा घोळ असतो, आणि आधीच्या पिढीचा तर खूप घोळ होता , म्हणजे आमच्या पुरकर काकांची जन्मतारीख वेगळी आणि शाळेतल्या दाखल्यामध्ये जन्मतारीख वेगळी, शाळेत ऍडमिशन साठी वय पूर्ण नसतं म्हणून तारीख बदलायची पूर्वी एक पद्धत होती, मुलाचं वय जास्त आहे असं दाखवलं जायचं , पण नंतर घोळ असा व्हायचा की नोकरीमध्ये ते कमी वय असून सुद्धा ते लवकर रिटायर व्हायचे, बऱ्याचशा लोकांचा जन्म तारखे बरोबर जन्म वेळेचा सुद्धा खूप घोळ झाला आहे.
चुकीची जन्मवेळ दिल्यामुळे जन्म पत्रिकेमध्ये भलतंच भविष्य लिहीलं जायचं. आत्ताच्या पिढीचा तसा घोळ नसावा असं मला वाटतं. आता Precise and exact time of birth दिला जात असावा. पण आता कोणी पत्रिका तयार करत असतील का याचीच मला शंका वाटते.
कधी कधी तारखेचे आणि वेळेचे घोळ चांगले हि असतात. Double celebration करायला मिळातं. तर दीपा तुला दोन दोन वाढदिवसाच्या Double शुभेच्छा”, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.
आणखी वाचा : “…म्हणून लोक आजारी पडत असतील का?” मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष
दरम्यान मिलिंद गवळी यांच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेता शांतनू मोघे यांनी दिपा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “दिपा मॅम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”, अशी कमेंट त्यांनी केली आहे. तर इतर चाहत्यांनी मिलिंद गवळींच्या पत्नींना शुभेच्छा दिल्या आहेत.
