‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘आई तुळजाभवानी’ ही नवी मालिका ३ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील ‘आई तुळजाभवानी’चे पात्र अभिनेत्री पूजा काळेने साकारलं आहे. ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका करताना पूजाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तसंच या मालिकेसाठी तिने खास शस्त्र प्रशिक्षणदेखील घेतलं आहे. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेसंदर्भात अभिनेत्री पूजा काळेबरोबर साधलेला खास संवाद…

अभिनेत्री पूजा काळेने ‘आई तुळजाभवानी’ पात्रासाठी कशी पूर्वतयारी केली? याविषयी सुरुवातीला सांगितलं. ती म्हणाली, “‘आई तुळजाभवानी’ ही संपूर्ण महाराष्ट्राची आराध्यदैवत आहे. या भूमिकेचं मला खूप दडपण आलं होतं. या भूमिकेसाठी ‘तुळजा महात्म्य’ या पुस्तकाचा मी खूप अभ्यास केला. रिसर्च टीम आणि मकरंद माने यांच्याबरोबर चर्चा करून, अभ्यास करत मी पात्र साकारत गेले. त्याचा मला खूप फायदा झाला. मी लहानपणापासून भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतलं आहे. दररोज न चुकता मी रियाज करते.”

हेही वाचा – “आमच्या हास्यजत्रेवाले हलकट लोक…”, अभिनेता प्रसाद ओक असं का म्हणाला? वाचा…

त्यानंतर युद्धकला आणि शस्त्रप्रशिक्षणाच्या अनुभवाबद्दल सांगताना पूजा म्हणाली की, कोणतंही शस्त्र चालवण्याची एक खास पद्धत असते. त्यानुसार देहबोलीत फरक पडत असतो. त्यानुसार दानपट्टी, तलवारबाजी, लाठीकाठीचे प्रशिक्षण घेऊन त्याची तालिम करत राहिलो. त्याचा फायदा असा झाला की हालचाल करताना सहजता आली. खोटं न वाटता त्यात खरेपणा यावा यासाठी शस्त्रप्रशिक्षण खूप जास्त गरजेचं आहे. दोन्ही हातांनी तलवारबाजी करणं आणि त्रिशूल घेऊन युद्ध हे दोन्ही एकसाथ करणं खूप चॅलेंजिंग वाटलं. फक्त युद्ध नव्हतं..तर सहा-साडे सहा फुटांच्या राक्षसांबरोबर युद्ध होतं. दमायला व्हायचं..पण सेटवरील सर्वांनी माझा उत्साह टिकवला.

पुढे सीनची तयारी कशाप्रकारे करतेस? असं पूजाला विचारलं. त्यावर पूजा म्हणाली, “युद्धाच्या तयारीबाबत आम्ही बेसिक कोरिओग्राफी करून व्हिडीओ रेकॉर्ड करतो. त्यामुळे शूटिंग करताना काहीही अडचण येत नाही. मकरंद सर आणि त्यांची टीम खूप सॉर्टेड आहे. त्यामुळे एखादा सीन वेळेत होण्यास मदत होते.” चारित्र्याची ताकद आणि व्यक्तिमत्त्वबद्दल बोलताना पूजा काळे म्हणाली,”‘आई तुळजाभवानी’ ही जगाची आई असून एक थोर योद्धा आहे. जी असूरांशी लढते..तिच्या चारित्र्याची ताकद आणि व्यक्तिमत्त्व खूप थोर आहे.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणने सांगितला लग्नाचा प्लॅन; निक्की, अभिजीतला म्हणाला…

शारिरीक आणि मानसिक सहनशक्तीबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, सतत शूट असल्यामुळे थकवा जाणवतो. पण नवीन सीन हातात आल्यानंतर एक नवेपणा येतो. उत्साह येतो. मानसिकतेसाठी तर ‘आई तुळजाभवानी’ स्वत: माझ्याबरोबर आहे असं मला जाणवतं. कारण ही भूमिका साकारताना मन आणि डोकं खूप शांत ठेवावं लागतं. मन शांत ठेवण्यासाठी गायत्रीमंत्र मी मनात बोलत असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे दिग्दर्शन आणि मालिकेच्या टीमबद्दल काय सांगशील? असा प्रश्न विचारला. तेव्हा पूजा म्हणाली, “‘आई तुळजाभवानी’ मालिकेची संपूर्ण टीम अनुभवी आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा मला सतत होत आहे. दिग्दर्शक मकरंद माने सर, विक्रम पाटील सर, डीओपी शेखर नगरकर सर अशी अनेक मंडळी सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. एखादा सीन समजावताना मकरंद माने सर छोट्या-छोट्या गोष्टींवर खूप भर देतात. सीनमधील प्रत्येक गोष्टीवर त्यांचं खूप बारकाईने लक्ष असतं. सगळेच खूप मदत करणारे आहेत. ‘आई तुळजाभवानी’ची ख्याती महिषासूर, मर्दिनी आहे. तोच धागा पकडून योद्धा असणारी तुळजाभवानी मांडली जात आहे. मालिकेबद्दलची आता खूप उत्सुकता आहे.”