प्रसिद्ध मॉडेल व बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडेने स्वत:च्या मृत्यूचा खोटा पब्लिसिटी स्टंट केल्याने सध्या सोशल मीडियावर तिच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. इंडस्ट्रीमधील बऱ्याच कलाकारांनी घडल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत पूनमला खडेबोल सुनावले आहेत. मराठीसह हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावेने देखील पूनमवर सडकून टीका केली आहे.

स्वत:च्या मृत्यूचा स्टंट केल्यामुळे अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत पूनम पांडेवर टीका केली आहे. अभिज्ञा लिहिते, “सध्या माझ्या मनात फक्त तिरस्कार, राग आणि निराशजनक भावना आहेत. सोशल मीडिया या प्रभावी माध्यमाला एकप्रकारे विनोद बनवून ठेवलं आहे. या सगळ्या गोष्टी फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी केल्या जातात. कर्करोग म्हणजे विनोद नाहीये…खूप मोठा आजार आहे. शिवाय अशाप्रकारची पीआर अ‍ॅक्टिव्हिटी देखील असूच शकत नाही. ज्या लोकांनी या आजारपणाच्या वेदना सहन केल्या आहेत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच याची भीषणता काय असते याची माहिती आहे.”

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आजारपणानंतर पूर्णा आजीची पुन्हा एन्ट्री! लेक तेजस्विनी पंडित आईबद्दल म्हणाली…

“ज्या व्यक्तीने हे एवढं मोठं नाट्य रचलं तिला आणि तिच्या कुटुंबीयांना या आजारपणाची झळ कधीही बसू नये. पीआर अ‍ॅक्टिव्हिटीसाठी अशाप्रकारचा विनोद करणं हे कितपत योग्य आहे? अशा लोकांनी सोशल मीडियापेक्षा आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. हे अतिशय निंदनीय आहे.” अशी पोस्ट शेअर करत अभिज्ञाने पूनमच्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा : ‘झिम्मा’ फेम दिग्दर्शकाने शेअर केला अमोल कोल्हेंचा लोकसभेतील व्हिडीओ; म्हणाला, “यालाच लोकशाही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
abhidnya bhave
अभिज्ञा भावेची पोस्ट

दरम्यान, पुढच्या पोस्टमध्ये अभिज्ञाने मीडियासह प्रसारमाध्यमांना “अशा लोकांना कव्हर करणे थांबवा. यांना अजिबात महत्त्व देऊ नका आणि अशा अमानवी लोकांवर बहिष्कार टाका” असं देखील म्हटलं आहे. सध्या अभिज्ञाने शेअर केलेल्या या दोन्ही पोस्ट चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.