scorecardresearch

Premium

Video: राज ठाकरे यांच्यामधील खुपणारी एक गोष्ट कोणती? अभिजीत बिचुकले म्हणाले…

अभिजीत बिचुकले यांनी राज ठाकरे यांच्यामधील खुपणारी कोणती गोष्ट सांगितली? जाणून घ्या…

abhijeet bichukale talk about mns chief raj thackeray
अभिजीत बिचुकले यांनी राज ठाकरे यांच्यामधील खुपणारी कोणती गोष्ट सांगितली? जाणून घ्या… (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. याचं कारण ठरलं आहे, अभिजीत बिचुकले. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या येत्या भागात ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले राजकारणी अभिजीत बिचुकले हजेरी लावणार आहेत. पण प्रेक्षकांना हे चांगलंच खटकलं आहे. ‘अरेरे… किती वाईट दिवस आले आहेत गुप्तेवर’, ‘कार्यक्रमाचा दर्जा घालवू नका’, ‘डोक्यावर पडले आहेत का झीवाले’?, ‘गुप्ते तुम्ही शो सोडून द्या’, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

यापूर्वीही या कार्यक्रमात नेतेमंडळींना पाहून ट्रोल करण्यात आलं होतं. ‘मराठी कलाकार संपलेत आणि राजकारणीच लोक आता कलाकार झालेत’, असं बोललं जात होतं. तसंच शोचं नाव ‘गुप्ते तिथे राजकारणी’, असं ठेवण्याचा खोचक सल्लाही देण्यात आला होता. असं असूनही पुन्हा एकदा चर्चित राजकारणी अभिजीत बिचुकले ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

avinash reel
Video: डोंगर, नदी अन्…; निसर्गाच्या सानिध्यात अविनाश नारकरांनी गायलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाणं, नेटकरी म्हणाले…
Optical Illusion Viral Photo
Optical Illusion : फोटोत 44Z1 दिसतय? मग 4421 नंबर कुठे आहे? हुशार असाल तर शोधून दाखवा
Parineeti Chopra-Raghav Chadha wedding menu
राघव चड्ढा-परिणीती चोप्राच्या लग्नात कोणत्या प्रकारचं जेवण असणार? अभिनेत्रीने स्वतः ठरवलाय खास मेन्यू
amitabh-bachchan
“…म्हणून मी माझे हाथ नेहमी खिशात ठेवतो” खुद्द बिग बीनींच सांगितलं कारण, म्हणाले “एका बेडकानं…”

हेही वाचा – मराठमोळ्या गिरीजा ओकने ‘जवान’साठी पहिल्या दिवशी पुण्यात केलेलं शुटिंग; ‘या’ ठिकाणाचा उल्लेख करत म्हणाली…

अभिजीत बिचुकलेंच्या भागाचा नवा प्रोमो नुकताच ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये अवधूत गुप्तेच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना बिचुकले पाहायला मिळत आहेत. अवधूत गुप्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव दाखवून विचारतो, “यांच्यामधील खुपणारी एक गोष्ट?” त्यावर अभिजीत बिचुकले म्हणतात, “आमच्या दोघांची परिस्थिती एकसारखी आहे. त्यांच्याकडे एकेकाळी १३ आमदार आले होते आणि माझं अजून खात उघडायचं आहे.”

हेही वाचा – रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाबरोबर राहतेय लिव्ह-इनमध्ये? ‘या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

त्यानंतर अवधूत विचारतो, “तुम्ही मनसेमध्ये सामील का नाही होत?” त्यावर बिचुकले म्हणतात, “बोलावणं आल्याशिवाय नाही.” असा हा नवा प्रोमोचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. यापूर्वीच्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले स्वतःच्या इंग्रजीचं कौतुक करताना दिसले होते. बिचुकले म्हणतात, “मी इंग्रजी असं बोलतो ना की, मी बोललेले शब्द डिक्शनरीमध्ये कुठे लिहिले आहेत हे कळणार नाही.” त्यानंतर ते काही वाक्यं इंग्रजीमध्ये बोलतात. हे ऐकून अवधूत गुप्ते म्हणतो, “एवढं फाडफाड इंग्रजी बोलायला लागलात की, मला आता कौतुकानं काय करावं हेच कळत नाहीये.”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी लग्नाच्या चर्चांवर स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी ४ फेब्रुवारीला…”

हेही वाचा – समुद्रात गाण्याचं शूटिंग करताना ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर घडली भयंकर घटना; व्हिडीओ आला समोर

दरम्यान, याआधी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, सुबोध भावे, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती. शिवाय राज ठाकरे, संजय राऊत, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, अमोल कोल्हे हे राजकारणी देखील सहभागी झाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abhijeet bichukale talk about mns chief raj thackeray in khupte tithe gupte upcoming episode pps

First published on: 07-09-2023 at 12:47 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
मराठी कथा ×