‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘अबोली’मध्ये काही दिवसांपूर्वी अभिनेता सुयश टिळकची धमाकेदार एंट्री झाली आहे. सचित राजे या भूमिकेत तो पाहायला मिळत आहे. मालिकेत सुयशची एक भूमिका असली तरी तो वेगवेगळ्या रुपात झळकला आहे. कधी वृद्धाच्या रुपात तर कधी स्त्रीवेशात झळकला आहे. अशातच त्याने मालिकेत नऊवारी साडी नेसण्याचा अनुभव सांगितला आहे.

हेही वाचा – Video: रोनाल्डोने सलमान खानकडे केलं दुर्लक्ष, नेटकरी म्हणाले, “आता याचं करिअर…”

‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी नुकताच अभिनेता सुयश टिळकने संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला, “नऊवारी नेसणं खूप अवघडं आहे. स्त्रिया आपापली नऊवारी कसं काय नेसतात, हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. इथे दोन-दोन लोक माझ्या मदतीला लागतात. पण आता नऊवारीची हळूहळू सवय होतेय. मी अजून पूर्णपणे स्वतःची स्वतः नऊवारी साडी नेसली नाही. पण पुढे हाच लूक राहिला तर मी शिकेन.”

हेही वाचा – Video: कुशल बद्रिकेने सोनाली कुलकर्णीवर केला विनोद अन् एकच हशा पिकला; पाहा व्हिडीओ

तसेच वेगवेगळ्या लूकसाठी तयार होताना किती वेळ लागतो, याविषयी बोलताना सुयश म्हणाला, “मी १० मिनिटात तयार होऊन सेटवर जाण्यासाठी प्रसिद्ध आहे. मी एकदा सकाळी तयार झालो तर ब्रेक होईपर्यंत मला मेकअपची फार गरज भासत नाही. मुळात मला मेकअप करण्यात वेळ घालवण्याची सवय नाहीये. पण आता मला करावं लागतं. हा मेकअप करायला दीड ते दोन तास लागतात. त्यात चेहऱ्यावरती काहीना काही ट्राय केलं जात. त्याला वेळ लागतो. ते व्यवस्थित दिसत की नाही, हे पाहिलं जातं. त्यामुळे या सगळ्याला खूप वेळ जातो. दीड-दोन तास मेकअपला दिलेला हा वेळ माझ्यासाठी खूप जास्त आहे. यानंतर पुन्हा जाऊन सीन करा. मग पुन्हा वेगळा लूक असेल तर तो बदला.”

हेही वाचा – “…तर तुमची आडनावं मुल्ला, खान असती”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काही दिवसांपूर्वी मला दिवसभरात जवळपास आठ वेळा साडी बदलावी लागली होती. मी साड्या बदलून थकलो होतो. बाकी दुसरीकडे सीन करणं हे आव्हानात्मकचं होतं,” असा एकंदरीत अनुभव सुयशने सांगितला.