अभिनेता गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचला. फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून त्याला ओळखले जाते. गौरव हा कायमच त्याच्या विनोदी अभिनय शैलीने प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसतो. प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडणाऱ्या गौरवचचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने सिनेसृष्टीतील मंडळी त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. अभिनेते किरण माने यांनीही गौरवसाठी खास पोस्ट लिहित त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

किरण माने यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी गौरव मोरेबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ते दोघेही हसताना दिसत आहे. या फोटोबरोबर त्यांनी गौरवला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
आणखी वाचा : अवधूत गुप्ते लवकरच करणार राजकारणात प्रवेश, घोषणा करत म्हणाला “माझा हेतू…”

किरण मानेंची पोस्ट

“…बिगबॉसच्या घरात बाहेरच्या जगातल्या लै लै लै गोष्टी मिस केल्या… त्यापैकीच एक म्हणजे कधीबी, कुठंबी मन आनि मेंदू फ्रेश करून टाकनारे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे भन्नाट एपिसोडस् ! सम्या, प्रभाकर, नम्रता, प्रसाद, ओंकार, अरूण आणि सगळी टीमच जबराट हाय… काॅमेडीत यांचा कुनी नाद नाय करायचा. पन ह्या सगळ्या जत्रेत बेसन लाडूमधल्या बेदान्यागत उठून दिसनारा सगळ्यांचा लाडका गौर्‍या म्हंजेच गौरव मोरे !! गौर्‍याची काॅमेडी म्हंजे नादखुळा… भिरकीट… काटा किर्रर्रर्र. गौर्‍याचं एकबी स्कीट असं नाय, जो बघून मी हसून हसून बेजार झालो नाय !!! लैच खतरनाक विनोदवीर. आज गौर्‍याचा वाढदिवस. आमच्या चेहर्‍यावर हास्य फुलवन्याचं अनमोल काम केल्याबद्दल लै आभार दोस्ता. वाढदिवसाच्या काळजापास्नं शुभेच्छा गौरव. लब्यू”, असे किरण माने यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्यात दीपिका पदुकोणचा शाही थाट, साडीची किंमत माहीत आहे का?

दरम्यान किरण माने हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही हजेरी लावली होती. ते बिग बॉसच्या घरात टॉप ३ स्पर्धकांपैकी एक होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी साताऱ्यात जंगी मिरवणूक काढण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर गौरव मोरे हा एक गुणी अभिनेता आहे. हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळवलेल्या गौरवने मराठी चित्रपटांतूनही अभिनयाची छाप पाडली आहे. हवाहवाई या चित्रपटात गौरव झळकला होता.