मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडेने नुकतीच लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुरुचीने ही आनंदाची बातमी दिली. सुरुचीने लग्नादरम्यानचे काही फोटोही पोस्ट केले होते. सुरुची आणि पियुष यांच्या लग्नानंतर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

आता लग्नानंतर सुरुची व पिषुष एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ते फिरायलाही गेले होते. दोघांनी या सहलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता सुरुचीने शेअर केलेल्या नव्या पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. लग्नानंतर पिय़ुषने बायकोसाठी खास पदार्थ बनवला आहे. पियुषने सुरुचीसाठी डोसा बनवला होता. अभिनेत्रीने सुरुचीने इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडीओ व फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत तिने . “आधीच मी तुझ्यावर या कलेमुळे इंप्रेस झाले होते” असे म्हणले आहे.

पियुष व सुरुची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणातसक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. पियुष एक उत्तम शेफ आहे. सुरुचीने अनेक मुलाखतींमध्ये याबाबतचा खुलासाही केला होता. अशातच पियुषने बायकोसाठी बनवलेल्या या खास पदार्थामुळे त्यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना बघायला मिळत आहे.

हेही वाचा- गोविंदाच्या भाचीचं लग्न, वाद असूनही कृष्णा मामाला देणार बहिणीच्या लग्नाची पत्रिका? म्हणाला, “आमच्यातील मतभेद…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुची व पियुषच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘का रे दुरावा’ मालिकेतून सुरुची घराघरांत पोहचली. ‘अवघाची संसार’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’, ‘आपलं बुवा’ मालिकांमधील तिची भूमिका चांगलीच गाजली; तर पियुषनेही आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील त्याच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या तो ‘काव्यांजली’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तर सुरुची सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत झळकत आहे.