‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. अभिनेत्री ईशा केसकर व अभिनेता अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे टीआरपीच्या यादीत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका टॉप-३मध्ये असते. अशा लोकप्रिय मालिकेतील कला म्हणजेच ईशा केसकर हिच्या बॉयफ्रेंडची एन्ट्री ‘स्टार प्रवाह’च्या परिवारात होणार आहे. ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ईशाचा बॉयफ्रेंड अभिनेता ऋषी सक्सेना झळकणार आहे.

अभिनेता ऋषी सक्सेना ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचला. ‘झी मराठी’च्या या लोकप्रिय मालिकेतील त्याने साकारलेली शिवकुमारची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या भूमिकेद्वारेच त्याला ओळखू जाऊ लागलं होतं. आता या मालिकेनंतर तब्बल ६ वर्षांनी ऋषी पुन्हा एकदा मराठी मालिकाविश्वात दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा – Video: ऐश्वर्या-अविनाश नारकरांनाही लागलं ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाण्याचं वेड, अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानासारखी हुबेहूब केली हूकस्टेप

अभिनेता ऋषी सक्सेनाची ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये लवकरच एन्ट्री होणार आहे. या मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मिहीर शर्मा हा उत्तम शेफ असतो. त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे.

या भूमिकेविषयी सांगताना ऋषी म्हणाला,”‘स्टार प्रवाह’बरोबर काम करण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. अखेर ती इच्छा पूर्ण होतेय. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. आपल्या आवडीच्या मालिकेत काम करायला मिळणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे.”

हेही वाचा – Video: अमिताभ बच्चन-अमृता सिंह यांच्या लोकप्रिय गाण्यावर गौरव मोरेसह जबरदस्त डान्स करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखतं का? पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे अभिनेता म्हणाला, “खरंतर खूप दिवसांपासून मराठी मालिकेत कधी दिसणार अशी विचारणा होत होती. मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतल्या मिहीर या व्यक्तिरेखेसाठी मला विचारण्यात आलं आणि मला ही व्यक्तिरेखा खूपच भावली. जवळपास ६ वर्षांनंतर मी मराठी मालिकेत काम करतोय. शूटिंगच्या पहिल्या दिवशी थोडं टेन्शन होतं. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला आपलसं करुन घेतलं. आजवर प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला भरभरुन प्रेम दिलं आहे. हेच प्रेम या नव्या भूमिकेलाही देतील याची खात्री आहे.”