actor vaibhav raghav cancer treatment mohsin khan and tv celebs help to raise fund | कॅन्सरशी झुंज, उपचारासाठी नाहीत पैसे अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यासाठी सहकलाकरांनी दिली मदतीची हाक | Loksatta

कॅन्सरशी झुंज, उपचारासाठी नाहीत पैसे अन्…; प्रसिद्ध अभिनेत्यासाठी सहकलाकरांनी दिली मदतीची हाक

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता वैभव राघव सध्या लास्ट स्टेजच्या कॅन्सरशी देतोय झुंज

Aditi malik, Mohit Malik, Karanvir Bohra, tv celebs seek help to raise fund for Vibhu Raghave, vibhu raghave, vaibhav raghave cancer treatment, Vibhu Raghave, Vibhu Raghave cancer treatment, mohsin khan, simple kaul, वैभव राघव, मोहसीन खान, वैभव राघव कॅन्सर
(फोटो सौजन्य- वैभव राघव इन्स्टाग्राम)

टीव्ही मालिका ‘निशा और उसके कजन्स’ फेम अभिनेता वैभव राघव सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. त्याला अखेरच्या स्टेजचा कॅन्सर असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २०२२ मध्ये वैभवने जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅन्सरबद्दल सांगितलं होतं तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यातून तो बराही झाला होता. पण पुन्हा एकदा त्याला कॅन्सरचं निदान झालं आहे. त्यामुळे आता त्याचे सहकलाकार आणि मित्र परिवार यांनी त्याला मदतीचा हात दिला असून सर्वजण त्याच्यासाठी फंड गोळा करत आहेत.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील अभिनेता मोहसीन खानने वैभवचे रुग्णालयातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत त्याने वैभवच्या उपचारांची माहिती दिली आहे. तसेच वैभवबद्दल डॉक्टरांचं काय म्हणणं आहे हे देखील सांगितलं आहे. मोहसीन खान आणि वैभव यांनी ‘निशा और उसके कजन्स’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं.

आणखी वाचा- इस्लामसाठी बॉलिवूड सोडणारी अभिनेत्री सना खान होणार आई? इन्स्टाग्राम पोस्टने वेधलं लक्ष

मोहसीनने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “नमस्कार मित्रांनो, मी माझा जवळचा मित्र आणि भाऊ वैभव कुमार सिंह राघवसाठी फंड गोळा करत आहे. तो एका दुर्मिळ कॅन्सरशी झुंज देत आहे आणि आता अखेरच्या स्टेजला आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच वैभवच्या वडिलांचं निधन झालं आहे. आज मी तुम्हा सर्वांना विनंती करत आहे की तुम्ही सर्वांनी त्यांला महतीचा हात द्या त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.”

याआधी अभिनेत्री सौम्या टंडननेही वैभव राघवसाठी आपल्या चाहत्यांना मदतीची हाक दिली होती. तिने इन्स्टाग्रामवर वैभवचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं, “आम्ही सगळेच त्याला चांगले उपचार देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यासाठी फंड गोळा करत आहोत. तुम्ही सर्वांनीही यात मदतीचा हातभार लावा.”

आणखी वाचा- राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात वादळ; आदिलची गर्लफ्रेंड तनु नेमकी आहे तरी कोण?

दरम्यान वैभव राघवने फेब्रुवारी २०२२ मध्ये पहिल्यांदाच त्याला कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन शेअर केली होती. त्यावेळी त्याने एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता की, “मागच्या काही दिवसांपासून मी आजारी होतो आणि त्यासाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर मला एका दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरचं निदान झालं आणि ही त्याची लास्ट स्टेज आहे. आयुष्यात असं काही होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.” हे सांगताना वैभवला रडू कोसळलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 13:03 IST
Next Story
Video: मारहाण, पैसे चोरल्याचा आरोप केल्यानंतर राखी सावतंची आदिल खानबरोबर डिनर डेट, नवऱ्याला भरवला घास अन्…; व्हिडीओ व्हायरल