‘मधुबाला’ व ‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’ या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या दमदार भूमिका साकारून अभिनेता विवियन डिसेना लोकप्रिय झाला. विवियन डिसेना सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. २०२३ मध्ये तो ‘उडारियां’ मालिकेत दिसला होता. विवियन सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पाच वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणारा विवियन सध्या रमझानच्या पवित्र महिन्यात रोजे ठेवत आहे.

ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या विवियनने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. २०१९ पासून आपण इस्लाम धर्माचे पालन करत असल्याचं विवियनने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आता त्याने रमजानबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी दरवर्षी रोजे ठेवतो, हे सहावं वर्ष आहे. मी आजारी नसेल तर पूर्ण ३० दिवस रोजे ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी पाणी आणि कॉफी खूप आवश्यक गोष्टी होत्या, त्यामुळे मी त्याशिवाय कसा राहू शकेन, असं मला आधी वाटायचं. माझे कुटुंबीय व मित्रही विचार करायचे की मी पाणी व कॉफीशिवाय १२-१४ तास कसा राहू शकतो. पण रोजे करण्याचा माझा प्रवास खूप चांगला असतो, मला काहीच त्रास होत नाही,” असं विवियन म्हणाला.

सलमान खान, शाहरुख खानचे चित्रपट नाकारले, वैयक्तिक आयुष्यातही आलं अपयश; दोन घटस्फोटांनंतर ‘ही’ अभिनेत्री आता…

View this post on Instagram

A post shared by Vivian Dsena (@viviandsena)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवियन डिसुझाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याने २०१३ मध्ये अभिनेत्री वाहबिज दोराबजीशी लग्न केलं होतं. पण आठ वर्षांनी २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर विवियनने दुसरं लग्न केलं. घटस्फोटानंतर विवियनने इजिप्तची पत्रकार नूरन अलीशी लग्नगाठ केलं, त्यांना एक मुलगीही आहे. याबाबत विवियन एका मुलाखतीत म्हणाला, “हो मी लग्न केलं आहे आणि मला चार महिन्यांची मुलगीही आहे. योग्य वेळ येईल तेव्हाच मी मुलगी आणि लग्नाबाबत सांगेन असं ठरवलं होतं.”