‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. गेल्या महिन्यात अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन झाले. वयाच्या ६८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनाला एक महिना उलटला असताना अंकिताने एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

अंकिता लोखंडने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती पिया ‘तोसे नैना लागे रे’ या गाण्यात नाचताना दिसत आहे. यावेळी तिने सप्तरंगी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन दिले आहे.

“मी खूप दिवसांनी माझ्याच तालावर नाचत आहे. निशू घरी आल्याबद्दल आणि मला हे करायला लावल्याबद्दल तुझे धन्यवाद. या सुंदर परफॉर्मन्सचे दिग्दर्शन निशांत भट्टने केले आहे”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र अंकिताच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या या व्हिडीओवर एका चाहतीने कमेंट केली आहे. “तुझे वडील जाऊन एक महिनाही झालेला नाही आणि तू डान्स करते”, असे तिने म्हटले आहे. “तुझ्या वडिलांच्या निधनानंतर किमान महिनाभर तरी धीर धर”, अशी कमेंट एका चाहतीने केली आहे. “वडिलांच्या निधनाचा काहीही फरक पडलेला दिसत नाही”, असे एकाने म्हटले आहे. “खरंच तुझी लाज वाटते, तुझे वडील महिन्याभरापूर्वी गेले आणि तू मात्र डान्स करतेस”, अशी कमेंट एकाने केली आहे.

ankita lokhande
अंकिता लोखंडेच्या पोस्टवरील कमेंट

दरम्यान सध्या अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरुन तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. पण या ट्रोलिंगवर अद्याप तिने काहीही भाष्य केलेले नाही.