मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. अनेकदा तिची फॅशनही चर्चेचा विषय बनते. काही वेळा तिच्या लूक्समुळे तिला ट्रोल केलं जातं. परंतु ट्रोलर्सकडे लक्ष न देता हेमांगी त्यांना सडेतोड उत्तर देत गप्पा करते. आता पुन्हा एकदा असंच काहीसं घडलं आहे.

अभिनेत्री अश्विनी कासार आणि हेमांगी कवी या दोघींनी मिळून एका ट्रेण्डिंग गाण्यावर एक डान्स करत त्याचा व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओतील दोघींचा अंदाज त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. परंतु हा डान्स करत असताना हेमांगीने घातलेल्या फुटवेअरबद्दल एका नेटकऱ्याने नकारात्मक कमेंट करत तिला सारख्या त्याच चपला वापरण्यावरून ट्रोल केलं.

आणखी वाचा : “काहीपण लिहायचं आणि….,” नेटकऱ्याच्या कमेंटवर हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्याने लिहिलं, “पाय बरा झाला असेल तर नवीन फुटवेअर घे. तेच तेच दिसत आहेत. बाकी रील मस्त!” नेटकऱ्याच्या या कमेंटकडे हेमांगीने दुर्लक्ष केलं नाही. तिने तिच्या स्टाइलने याला उत्तर दिलं. तिने लिहिलं, “तुम्हीच घेऊन द्या नवीन.” तर यावर त्या नेटकऱ्याने लिहिलं, “ओ माय गॉड! माय प्लेजर. मी घेऊन देतो पण तुम्हाला MH23 ला यावं लागेल.” त्यावर हेमांगी म्हणाली, “तुम्हाला माझ्या फुटवेअरचा प्रॉब्लेम आहे ना, मग मला वाटतं की तुम्हीच यावं. मी नाही. हेच फुटवेअर पुढचे दहा वर्षं वापरायलाही मी तयार आहे.”

हेही वाचा : शूटिंगदरम्यान हेमांगी कवीला दुखापत, त्याच अवस्थेत नाटकाचा प्रयोग केला अन् असं काही झालं की…; पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता हेमांगी-अश्विनीचं हे रील आणि त्यावर हेमांगीने ट्रोलरला दिलेलं हे सडेतोड उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.