अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या कामाचा प्रेक्षक कौतुक करत असतातच पण याचबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती चांगलीच चर्चेत असते. आता ऋताने तिच्याबद्दल कोणालाही माहीत नसलेली एक गोष्ट शेअर केली आहे.

ऋता आतापर्यंत अनेक मालिका, नाटक, चित्रपट यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आतापर्यंत तिने केलेल्या सगळ्याच कामांमध्ये तिला खूप चांगले सहकलाकार लाभले. अनेक अभिनेत्यांबरोबरची ऋताची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना आवडली. पण काम करत असताना ती तिच्या सहकलाकाराच्या प्रेमात पडली आहे असा खुलासा तिने केला.

आणखी वाचा : “कुठे मिळते अशी सासू…,” ऋता दुर्गुळेने उलगडलं सासूबाईंबरोबर असलेलं नातं, म्हणाली, “त्या खूप…”

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला विचारण्यात आलं की, “तू कधी सहकलाकाराच्या प्रेमात पडली आहेस का?” त्यावर ऋताने दिलेल्या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधलं. ती म्हणाली, “हो. पण मी त्याचं नाव नाही सांगणार.” त्यामुळे एका प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करत असताना ती तिच्या एका सहकलाकाराच्याही प्रेमात पडली होती असं तिने कबूल केलं.

हेही वाचा : “… म्हणून ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटक सोडलं,” ऋता दुर्गुळेने स्पष्ट केलं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या वर्षी ऋताने प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. प्रतीक शाह हा दिग्दर्शक आहे. आतापर्यंत त्याने अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. तर अनेकदा ऋता आणि प्रतीक सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात.