छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांमधील एक कार्यक्रम म्हणजे ‘इंडियन आयडल’. या रिअॅलिटी शोला प्रेक्षक भरभरुन प्रेम देताना दिसतात. शिवाय या कार्यक्रमामुळे काही गायक नावारुपाला आले. विशाल ददलानी, हिमेश रेशमिया, नेहा कक्कर या शोच्या परीक्षक पदाची धुरा सांभाळताना दिसतात. तर आदित्य नारायण या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करतो. मात्र याआधी बऱ्याचदा ‘इंडियन आयडल’बाबत अनेक वाद निर्माण झाले. हा शो स्क्रिप्टेड असल्याचं बोललं गेलं. आता पुन्हा एकदा या शोवरुन वाद निर्माण झाला आहे.
आदित्य नारायणपूर्वी जवळपास या कार्यक्रमाच्या सहा सीझनचं सुत्रसंचालन मिनी माथुरने केलं. पण अचानकच हा शो तिने सोडला. आता बऱ्याच वर्षांनंतर तिने याबाबत भाष्य केलं आहे. Cyrus Broachaला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिनीने शो सोडण्यामागचं कारण सांगितलं. तसेच या शोमधील खरी परिस्थिती सगळ्यांसमोर आणली.
आणखी वाचा – “आज त्याच्याकडे फेम आहे पण…” एमसी स्टॅनच्या वागणुकीवर भडकले पुण्याचे गोल्डन बॉईज, म्हणाले, “गर्व…”
मिनी म्हणाली, “मी हा शो तेव्हाच सोडला जेव्हा मला हा रिअॅलिटी शो खरा नसल्याची जाणीव झाली. मी या शोचे सहा सीझन केले. पण त्यानंतर फक्त पैसे कमावणं हाच या शोचा उद्देश होता. अशा खोट्या शोचं कौतुक करणं मला शक्य नव्हतं. म्हणूनच मी हा शो करण्यास पुढे नकार दिला”. मिनीचं हे म्हणणं ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
शिवाय मिनीने एक किस्साही सांगितला. ती म्हणाली, “एकदा एका स्पर्धकाला त्याचे कुटुंबीय मंचावर आले आहेत हे पाहून चेहऱ्यावरचे हावभाव बदलण्यास सांगण्यात आलं. पण कुटुंबीय या कार्यक्रमामध्ये येणार आहेत हे त्याला आधीच माहीत होतं. हे सारं काही स्क्रिप्टेड असतं”. मिनीच्या या वक्तव्यानंतर या कार्यक्रमामधील खरी परिस्थिती समोर आली आहे.