‘दिया और बाती’ फेम टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकारने २०२२ मध्ये अभिनय जगतापासून संन्यास घेतला. ती भगवे कपडे परिधान करून हिमालयात राहते. तिने तिचं मुंबईतील घर भाड्याने दिलं आणि ती आध्यात्माकडे वळली. सध्या उत्तराखंड असलेली ही अभिनेत्री केदारनाथमध्ये अडकली आणि तिला हेलिकॉप्टरने वाचविण्यात आलं.

स्वानंदीने आशिष आवडतो सांगितल्यावर तुम्ही काय केलं? उदय टिकेकर म्हणाले, “आम्ही एका रात्रीत…”

नूपुर अलंकार नुकतीच केदारनाथला भेट देण्यासाठी गेली होती, पण तिथे दरड कोसळली, त्यामुळे ती तिथेच अडकली. तिने सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. नुपूरने केदारनाथ येथे दर्शन घेतले पण येताना मुसळधार पाऊस आणि दरड कोसळून ती अडकली. तिच्यासोबत इतरही लोक होते. त्यानंतर त्या सर्वांची हेलिकॉप्टरने सुटका करण्यात आली.

नुपूरने व्हिडीओ शेअर करून सांगितलं की ती इथे एक डिग्री तापमानात राहिली. त्यानंतर त्यांना तिथून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. दोन तास ती तिथे अडकून पडली होती. दरड कोसळली तिथला व्हिडीओही नुपूरने शेअर केला आहे.

दरम्यान, नुपूरने अभिनय क्षेत्र सोडल्यानंतर धार्मिक प्रवासाला सुरुवात केली. संन्यासी झाल्यानंतर तिने आपले कुटुंबही सोडले. नुपूर तिच्या धार्मिक प्रवासाचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुपूर अलंकारने ‘शक्तिमान’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’ आणि ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. पण २०२२ मध्ये ती सर्व काही सोडून सन्यासी बनली. आता ती आध्यात्माकडे वळली आहे. ती देशभरातील मंदिरांमध्ये जाऊन दर्शन आणि आशीर्वाद घेते.