Actress Pooja Banerjee Welcomes Baby Boy: ‘कसौटी जिंदगी की’, ‘कुमकुम भाग्य’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी दुसऱ्यांदा आई झाली आहे. ३३ वर्षीय अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी दिली आहे. पूजा सध्या मुंबई सोडून दिल्लीत राहत आहे.

पूजाच्या पतीचे नाव संदीप सेजवाल असून त्यांनी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. या जोडप्याला एक मुलगी आहे. आता पूजाने मुलाला जन्म दिला आहे. आज सकाळी (७ जून रोजी) तिला मुलगा झाला. “पूजाने आज सकाळी मुलाला जन्म दिला. आम्ही सगळे खूप खूश आहोत. पूजा व आमचं बाळ दोघेही सुखरूप आहेत,” असं तिचा पती संदीप सेजवाल ई-टाइम्सशी बोलताना म्हणाला.

“आम्हाला ही बातमी सर्वांना सांगताना खूप आनंद होत आहे, आणि आता आमचे चार जणांचे कुटुंब पूर्ण झाले आहे. मी आणि बाळ बरे आहोत,” असं पूजा म्हणाली.

पूजाने दीड महिन्यापूर्वी फोटो शेअर करून ती आई होणार असल्याची माहिती दिली होती. अभिनयात पुनरागमन करण्याबद्दल पूजा म्हणालेली, “हे सगळं माझ्या आरोग्यावर आणि माझ्या मुलांच्या गरजांवर अवलंबून आहे. मला स्वतःवर जास्त दबाव नकोय, त्यामुळे मी स्वत:ला वेळ देईन आणि मला कोणत्या संधी येतात ते पाहीन.”

पूजाने सांगितला दिल्ली-मुंबईतील फरक

पूजा मुंबई सोडून नवी दिल्लीला राहायला गेली आहे. “मुंबईपेक्षा हे शहर खूप वेगळे आहे. आमचं संयुक्त कुटुंब आहे, कुटुंबातील अनेक सदस्य मुलांची काळजी घेतात. घरात नेहमी कोणतं ना कोणतं सेलिब्रेशन होत असतं. मुख्य म्हणजे इथे मुंबईपेक्षा जास्त जागा आहे,” असं पूजाने नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईला परतण्याबद्दल पूजा व्यक्त झाली. “मला मुंबईची आठवण येते. मला कॅमेरा आणि अभिनयाची खूप आठवण येते. पण मला माझ्या मुलांना वाढवण्यासाठी, त्यांना खेळण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी पुरेशी जागा इथे आहे याचा मला आनंद आहे,” असं पूजा म्हणाली.