‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेले काही दिवस एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ‘मिसेस रोशन सिंह सोढी’ ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. जेनिफरने असित मोदींबरोबरच प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याबद्दलची तक्रार दाखल केली होती. या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी तिने केलेले आरोप फेटाळले. तर जेनिफरनंतर आता या मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने निर्मात्यांविरुद्ध आवाज उठवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत ‘रिटा रिपोर्टर’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री प्रिया अहुजाने नुकतीच ‘ई टाइम्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनेदेखील असित मोदी आणि प्रॉडक्शन टीमवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.  याचबरोबर या मुलाखतीमध्ये तिला शैलेश लोढा, जेनिफर मिस्त्री, मोनिका भदौरिया यांनी निर्मात्यांविरुद्ध केलेल्या वक्तव्यांबाबतही विचारण्यात आलं. यावरदेखील तिने तिची स्पष्ट प्रतिक्रिया देत मालिकेच्या सेटवर कलाकारांना वाईट वागणूक दिली जाते असं म्हटलं.

आणखी वाचा : “तो पुरुष असल्याने…,” ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरबद्दल जेनिफर मिस्त्रीने व्यक्त केला संताप, जाणून घ्या नेमकं काय घडलं

प्रियाने स्वतःचा अनुभव शेअर करत सांगितलं, “या मालिकेमध्ये काम करत असताना कलाकारांना अनेक मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतं. या मालिकेत काम करत असताना मलाही अनेक मानसिक त्रास सहन करावे लागले. पण मला याचा इतका त्रास जाणवला नाही, कारण माझे पती मालव १४ वर्षे या मालिकेचे दिग्दर्शक म्हणून काम करत होते. असितकुमार मोदी भाई, सोहिल रमाणी किंवा जतिन बजाज हे माझ्या धाकट्या भावासारखे आहेत, त्यांनी माझ्याशी कधीही गैरवर्तन केलं नाही. पण कामाच्या बाबतीत निर्मात्यांनी माझ्याबरोबर अन्याय केला. मालव आणि माझं लग्न झाल्यानंतर या मालिकेतून माझा ट्रॅक कमी केला गेला. माझ्या गरोदरपणानंतर आणि मालवने शो सोडल्यानंतर शोमधील माझ्या ट्रॅकबद्दल मला काहीच माहिती नाही.”

हेही वाचा : “तुम्ही कितीही…” तारक मेहता फेम शैलेश लोढा यांचा निर्माते असित मोदी यांच्यावर निशाणा, वाद गेला विकोपाला

पुढे ती म्हणाली, “मी अनेकदा असंच मोदींना माझ्या ट्रॅकबद्दल विचारलं. पण त्यांच्याकडून काही उत्तर आलं नाही. तुला काम करायची काय गरज, मालव काम करत आहे ना? असं मला असित मोदी म्हणायचं. त्यामुळे मालवशी लग्न करण्याआधी मी या कार्यक्रमाचा भाग होते. मला कधीही या मालिकेत काम करत असताना योग्य वागणूक मिळाली नाही. मोनिका भदौरिया आणि इतर कलाकार असित मोदींबद्दल जे बोलत आहेत ते खोटं नाहीये. त्यांनी माशीला बाजूला करतात तसं मलादेखील कार्यक्रमातून बाजूला केलं.” प्रियाच्या या बोलण्यामुळे पुन्हा एकदा या मालिकेच्या चाहत्यांना धक्का बसला आहे

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress priya anuja expressed her anger for tarak mehta ka ooltah chashma producer asit modi and team rnv
First published on: 22-05-2023 at 11:20 IST