मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत ऋतुजा बागवे हिचा समावेश होतो. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम करत ती प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आतापर्यंत तिने साकारलेल्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आता ऋतुजाने एक आनंदाची बातमी चहात्यांची शेअर केली आहे. ही बातमी म्हणजे तिने नुकतंच नवीन घर घेतलं.

ऋतुजा बागवेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या चाहत्यांशी संपर्कात असते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिच्या वाढदिवशी तिने नवीन घर घेतल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. त्यादिवशी तिचं हे नवीन घर पहायला ती तिच्या कुटुंबियांसोबत गेली होती. त्यावेळचे काही फोटो तिने पोस्ट करत तिला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे तिने आभार मानले होते. आता तो फ्लॅट तिला मिळाला असल्याचं तिने सांगितलं.

आणखी वाचा : “जेव्हा लोक विचारतात, वय झालंय लग्न कधी करणार? तेव्हा…” ऋतुजा बागवेची पोस्ट चर्चेत

ऋतुजाने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीमध्ये तिच्या हातात घराच्या किल्ल्या दिसत आहेत. तर त्यापाठी दारावर ऋतुजा बागवे असं नाव लिहिलेलं दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “फ्लॅट मिळाला आता घर बनवायचंय.”

तर त्यापाठोपाठ गृहप्रवेश करतानाचा एक व्हिडीओ तिने पोस्ट केला. या व्हिडीओत ती तिचे आई-बाबा व तिच्या खास मित्रमंडळींबरोबर या तिच्या ड्रीम होममध्ये प्रवेश करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “शाळेत असताना बाबा ५रू. pocket money द्यायचे. ३रू. खर्च करुन २रू. piggy bank मधे ठेवायचे. कधी कधी काहीही न घेता ५रू. piggy bank मधे टाकायचे. ती सवय, स्वभाव, संयम, शिस्त, small sacrifices, आई बाबा आणि देवाची कृपा ह्यामुळे शक्य झालं.”

हेही वाचा : अभिनेत्री ऋतुजा बागवेने लालबागच्या राजाला अर्पण केला ‘खास’ प्रसाद, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिच्या या पोस्टनी आता सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. ऋतुजाने घेतलेलं हे घर तिने स्व कमाईतून घेतलेलं पहिलं घर आहे. त्यामुळे हे घर तिच्यासाठी नक्कीच तिच्यासाठी खास आहे. आता तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते आणि मनोरंजनसृष्टीतील तिची मित्र मंडळी तिचं अभिनंदन करत आहेत.