महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. या कार्यक्रमाच्या अनेक स्किटमधील कोहली फॅमिली ही प्रचंड लोकप्रिय आहे. या स्किटवर एका चाहत्याने धम्माल रॅप तयार केलं असून त्यावर अनेकांनी रिल्स शेअर केले आहेत. नुकतंच सोशल मीडियावरील त्या रिल्सवर अभिनेत्री शिवाली परबने प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब ही कायमच प्रसिद्धीझोतात असते. नुकतंच शिवालीला कोहली फॅमिलीवरुन व्हायरल होणाऱ्या रॅपबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने तिची एक इच्छाही बोलून दाखवली. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितले.
आणखी वाचा : Video: “मी अवली लवली…” ‘हास्यजत्रे’च्या कोहली फॅमिलीचा व्हिडीओ पाहून मंजिरी ओकने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, फोटो व्हायरल

शिवाली परब काय म्हणाली?

“शिवाली अवली कोहली हे गाणं आम्ही बनवलं होतं. त्यामुळे त्याचा रिल आम्ही सर्वात आधी करुन टाकणार असं ठरवलं होतं. पण ते टाकेपर्यंत इतक्या लोकांनी त्यावर रिल बनवले आणि आम्हाला टॅग केले आहे. सध्या सोशल मीडियावरही ते खूप ट्रेंड होतंय. यामुळे आम्हाला खूप मज्जा येते.

जर कोणी त्यावर रिल करुन टाकणार असाल तर मला टॅग करा. मी ते नक्कीच शेअर करेन. कारण ते आपल्याच स्कीट आहे. ते इतकं प्रसिद्ध होतंय तर माझी अशी खूप इच्छा आहे की ते विराट कोहलीपर्यंत नक्की पोहोचावं आणि त्यांनीही त्याची मजा घ्यावी”, असे शिवालीने म्हटले.

आणखी वाचा : Video: ‘मी अवली लवली…’वर भन्नाट नाचला रेमो डिसूझा, डान्सचा व्हिडीओ पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या स्किटमधील कोहली फॅमिलीही प्रचंड लोकप्रिय आहे. या स्किटमधील सगळ्या पात्रांची नावे आणि संवादाचा शेवटही ‘ली’ या अक्षरानेच होतो. समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, नम्रता संभेराव व प्रियदर्शनी हे कलाकार अचूक टायमिंग साधत या स्किटद्वारे विनोदनिर्मिती करतात. त्यांच्या या स्कीटवर केलेल्या धम्माल डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.