गेली अनेक वर्षं आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे. मराठी मनोरंजन सृष्टीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सूनेने त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराज कुलकर्णी गेल्या वर्षी अभिनेत्री शिवानी रांगोळी हिच्याशी विवाहबद्ध झाला. विराजस आणि शिवानी हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. विराजसची आई मृणाल कुलकर्णी यांची शिवानी ही अत्यंत लाडकी आहे. त्या दोघींमध्ये सासू-सूनेपेक्षा मैत्रिणींचं नातं आहे. आज सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने एक खास पोस्ट लिहिली आहे. पण या पोस्टमध्ये तिने मृणाल कुलकर्णी यांना ज्या नावाने हाक मारली त्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
आणखी वाचा : मृणाल कुलकर्णी यांनी खाल्ले होते तळलेले किडे, अनुभव शेअर करत म्हणाल्या, “त्याची चव…”
शिवानीने त्या दोघींचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं, “हॅपी बर्थ डे ताई! तू नेहमीच माझा आत्मविश्वास वाढवतेस, मला प्रोत्साहन देतेस. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस त्यासाठी खूप थँक्यू. तू प्रत्येकाच्या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवतेस आणि कायम सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात असतेस. तुझा सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा मार्ग खूप प्रेरणादायी आहे. हे सगळं करून तू तुझी एनर्जीही टिकवून ठेवतेस. तुझे पुढील सगळे वाढदिवस असेच प्रेमाने आणि शांतीने भरलेले जावो.”
हेही वाचा : “फक्त मालिकेतल्या सासू व नवऱ्यालाच…” मृणाल कुलकर्णींचा सून शिवानी रांगोळेला मजेशीर सल्ला
शिवानीची ही पोस्ट आता खूप चर्चेत आली आहे. ह्या पोस्टमधून शिवानी मृणाल कुलकर्णी यांना आई किंवा सासूबाई नाही तर ‘ताई’ अशी हाक मारते याचा खुलासा झाला आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत आता नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. याचबरोबर मृणाल कुलकर्णी यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.