श्रद्धा आर्या ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. श्रद्धा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक फोटो व व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. सध्या श्रद्धाने शेअर केलेल्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे.

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे श्रद्धा आर्या पुन्हा विवाहबंधानात अडकल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शननेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. परंतु, श्रद्धा खऱ्या आयुष्यात नव्हे तर मालिकेत विवाहबंधनात अडकली आहे. श्रद्धाने शेअर केलेले फोटो हे मालिकेच्या सेटवरील आहेत.

हेही वाचा>> Video: लिपलॉक, रोमान्स अन्…; ‘टर्री’ चित्रपटातील नवीन गाण्यात ललित प्रभाकर व गौरी नलावडेचा रोमँटिक अंदाज

हेही वाचा>> नाना पाटेकरांवर जडलेलं मनीषा कोईरालाचं प्रेम; पण अभिनेत्याला दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर रुममध्ये पाहिलं अन्…

श्रद्धा आर्या सध्या ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत ती विवाहबंधनात अडकली आहे. पण एकदा नव्हे तर तब्बल १० वेळा तिने मालिकेत लग्नगाठ बांधल्याचं श्रद्धाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. “जेव्हा एकाच मालिकेत तुम्ही १० वेळा विवाहबंधनात अडकता..तेव्हा का, कधी व कोणाबरोबर याची तुम्ही पर्वा करत नाही”, असं मजेशीर कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा>> Video: स्वत:च्याच लग्नात हटके ड्रेस परिधान केल्यामुळे मसाबा गुप्ता ट्रोल; नेटकरी म्हणाले “फॅशन डिझायनर असूनही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, श्रद्धा आर्याच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या असल्या तरी तिने खऱ्या आयुष्यात राहुल नागल यांच्यासह लग्नगाठ बांधली आहे. श्रद्धाचे पती नौदल अधिकारी आहेत. २०२१ मध्ये श्रद्धाने विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.