कलाकार हे त्यांच्या कामाच्या शैलीबरोबरच त्यांच्या काम करण्याच्या डेडिकेशनमुळे अनेकदा चर्चेत येतात. आपण करत असलेला सीन खरा वाटावा यासाठी ते खूप मेहनत घेत असतात. कोणी स्टंट स्वतः करतं, तर कोणी आजारपणातही शूटिंग करतं. तर आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

ही अभिनेत्री म्हणजे श्वेता मेहेंदळे. श्वेता आतापर्यंत अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील तिच्या कामाचं आणि खूप कौतुक होत आहे. आता या मालिकेसाठी तिने चक्क पेटलेला कापूर हातात घेतला.

आणखी वाचा : अमृता खानविलकरने भर रस्त्यात ६ फूट उंच माणसाची केली होती धुलाई, घडलेला प्रसंग शेअर करत म्हणाली…

श्वेताने नुकताच सोशल मीडिया अकाउंटवर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ मालिकेचा एक बिहाइंड द सीन व्हिडिओ आहे. यामध्ये श्वेता देवासमोर हातात कापूर ठेवून बसलेली दिसत आहेत. तेवढ्यात एक व्यक्ती तिच्या हातावर असलेला कापूर पेटवतो आणि इतक्यात समोर कॅमेरा सुरू होतो आणि हा सीन शूट होतो. हा व्हिडिओ श्वर करत तिने लिहिलं, “उरी कल्लोळ उठला…”

हेही वाचा : “जेव्हा मोठे झालो तेव्हा…”, ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम खुशबू तावडेने दिला रक्षाबंधनाच्या आठवणींना उजाळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यावर कमेंट करत आता नेटकरी तिच्या डेडिकेशनचं खूप कौतुक करत आहेत. तर याचबरोबर अनेकांनी प्रेमापोटी तिची विचसरपूसही केली आहे.