झी मराठीवरील तू चाल पुढं ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेत अंकुश चौधरीची पत्नी दीपा चौधरी प्रमुख भूमिकेत दिसत असून या मालिकेच्या निमित्ताने तिने दीर्घ काळाने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेतील सगळ्या पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अशातच या मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्री एग्झिट घेत आहे.
या मालिकेतून बाहेर पडणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहा माजगावकर. या मालिकेत केला प्राजक्ता पांडे ही व्यक्तिरेखा साकारली. प्राजक्ता पांडे ही अश्विनीचे खास मैत्रीण असते. पण स्नेहाने नुकतीच एक पोस्ट शेअर करत आता ती या मालिकेत दिसणार नसल्याचं सांगितलं.
स्नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून या मालिकेतील एक बिहाइंड द सीन व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “यादों की अलमारी… सिरीयल संपत नाहीये पण यापुढे मी सिरीयल मध्ये नसेन…” तिची ही पोस्ट बघताच तिच्या चाहत्यांना धक्का बसला. पण तुम्ही ही मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला याचं कारण अजून समोर आलेलं नाही.