गणेश चतुर्थी म्हटले की, बाप्पाचा मखर आणि मुख्य म्हणजे उकडीचे मोदक या दोन गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा आठवतात. गणरायाच्या आगमनासाठी आपले लाडक्या कलाकारांनी आता चांगलीच तयारी केली होती. कोणी मखर सजवून ठेवले होते, तर कोणी बाप्पाला घरी आणण्याच्या तयारीत होते. आज या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सेलिब्रिटी मंडळींनीही त्यांचा आनंद आणि उत्साह सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री स्पृहा जोशीदेखील बाप्पाच्या स्वागतासाठी तयार झाली होती. स्पृहाने त्याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात व्हिडीओमध्ये स्पृहा उकडीचे मोदक बनविताना दिसतेय. स्पृहाने स्वत:च्या हाताने मोदक तयार करताना त्याला छानशा कळ्याही पाडल्या आहेत. तिच्या या व्हिडीओला चाहते भरभरून पसंती देत आहेत. ‘या वर्षातला हा सगळ्यात सुंदर क्षण आहे, गणपती बाप्पा मोरया’ अशी कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा – “… म्हणून आईनं मला मारलेलं”, अभिनेत्री प्राजक्ता माळी स्वत:च खुलासा करत म्हणाली, “त्यावेळी…”

स्पृहा अभिनेत्री व कवयित्री असण्याबरोबरच खवय्यादेखील असल्याचे तिने अनेकदा विविध पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितलेय. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिने केलेल्या या उकडीच्या मोदकांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स करीत एका युजरने म्हटले आहे की, “मोदक अतिशय सुबक आणि सुरेख दिसतायत, असे लिहून स्पृहाला सुगरण म्हटले आहे. तू केलेले मोदक तुझ्याचसारखे गोड आणि सुंदर दिसत आहेत,” असे म्हणत चाहत्यांकडून स्पृहाच्या या व्हिडीओला पसंती मिळत आहे.

हेही वाचा – ठरलं तर मग : प्रियाचा डाव फसला! पूर्णा आजीचा ‘तो’ निर्णय अन् प्रतिमा-रविराजसह सायलीने केली बाप्पाची पूजा, पाहा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पृहा जोशीबद्दल सांगायचे झालेच तर तिच्या कवितांचा आणि अभिनयाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ आणि ‘पुनश्च हरीओम’ या सिनेमांतील भूमिकांसाठी तिचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. सध्या ती कलर्स मराठी या वाहिनीवरील सुख कळले या मालिकेत मिथिला ही व्यक्तिरेखा साकारत आहे. वकील असलेली मिथिला तिच्या पतीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढताना दिसत आहे. बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर मालिकाविश्वात स्पृहा एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. तिने आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून कायमच प्रेम मिळाले आहे. आतासुद्धा तिने साकारलेल्या मिथिला या भूमिकेला चाहत्यांकडून भरभरून पसंती मिळत आहे.