अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे. वैदेहीने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत भूमिका साकारत आपला एक वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मनोरंजनसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव सामील आहे. गेले काही महिने ती ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद २’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. तर आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता हे तिने सांगितलं आहे.

आणखी वाचा : “हिला स्वतःची पोरं सांभाळता आली नाहीत आणि…”, ‘आई कुठे काय करते’च्या ट्रॅकमुळे प्रेक्षक हैराण, नाराजी व्यक्त करत म्हणाले…

‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद २’ हे पर्व खूप गाजत आहे. या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा वैदेही परशुरामी सांभाळत आहे. तर या कार्यक्रमाच्या परीक्षकांच्या भूमिकेत आदर्श शिंदे, सचिन पिळगावकर आणि वैशाली सामंत हे दिग्गज दिसत आहेत. आता लवकरच या पर्वाचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. तर या संपूर्ण पर्वाचा अनुभव शेअर करताना तिने या तिघनबरोबर काम करताना तिला कसं वाटलं हे सांगितलं आहे.

हेही वाचा : ‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता झाली आहे मोठी! तेजश्री वालावलकरची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं मी खूप एन्जॉय केलं. यातील सगळ्या लहान मुलांशी माझं खूप चांगलं बॉण्डिंग तयार झालं आहे. या कार्यक्रमाचं परीक्षण आदर्श शिंदे, सचिन पिळगावकर आणि वैशाली सामंत करत आहेत. मला या सगळ्यांबरोबरच काम करताना सुरुवातीला खूप दडपण आलं होतं. कारण हे तिघेही खूप अनुभवी आहेत आणि मला त्या तिघांचंही काम खूप आवडतं. त्यामध्ये मी खूपच ज्युनिअर आहे. पण या तिघांनी मला खूप छान सांभाळून घेतलं. त्यांच्याबरोबर मी खूप मजा केली. ते त्यांचे जे अनुभव शेअर करत असतात त्यातूनही मला खूप काही शिकायला मिळालं. त्यामुळे या तिघांच्याही सहवासातूनही मी अनेक गोष्टी शिकले.” तर आता वैदहीचं बोलणं चर्चेत आलं आहे.