विविध विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. विशाखा सुभेदारने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशाखाने एका मुलाखतीत तिच्या व्यक्तिक आयुष्याबाबतचा खुलासा केला आहे.
एका कार्यक्रमात विशाखाला प्रश्न विचारण्यात आला होता की मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसांना करिअर पकडायच्या आधी लोकल ट्रेन पकडावी लागते. तुम्ही मात्र या दोन्ही गोष्टी वेळेवर पकडल्या त्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा होता? या प्रश्नाला उत्तर देताना विशाखा म्हणाली, “अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मी शिक्षिका म्हणून काम करायचे. तसेच मी आकाशवाणीवरही काम केलं आहे. त्यावेळी मी लोकलमधून प्रवास करत होते. लोकलमधून प्रवास करताना मी ड्रेस मटेरिअल, कॉस्मॅटिक्स आणि महिलांच्या गरजेच्या वस्तू होलसेलमधून विकत घ्यायची आणि आकाशवाणीमधील मैत्रिणींना तसेच लोकलमधील महिलांना मी त्या वस्तू विकायची.”
हेही वाचा- “कबीर सिंग चित्रपटामुळे मला…”; अभिनेत्री वनिता खरातने व्यक्त केली खंत, म्हणाली….
दरम्यान विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत ‘फक्त लढ म्हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडच्या काळात, विशाखा ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ६६ सदाशिव (२०१९) या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या.