Aishwarya & Avinash Narkar : मराठी कलाविश्वात ऐश्वर्या व अविनाश नारकरांची नेहमीच चर्चा असते. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये या जोडप्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या ही जोडी सोशल मीडियावरील रील्समुळे सर्वत्र चर्चेत असते. ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या डान्स व्हिडीओला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून नारकर कपल परदेशात फिरायला गेलं आहे. अभिनेत्रीने ‘व्हेकेशन मोड ऑन’ असं कॅप्शन देत एअरपोर्टवरील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या व अविनाश दोघेही एअरपोर्टची सफर करत असल्याचं पाहायला मिळतंय.

मात्र, या व्हिडीओमध्ये दोघांनीही ते नेमके कुठे जात आहेत याबाबत माहिती दिली नव्हती. त्यामुळे नेटकऱ्यांनी ‘हॅप्पी जर्नी’ म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर, अनेकांनी नारकर जोडपं नेमकं कुठे जात असेल याचा अंदाज बांधायला सुरुवात केली होती.

ऐश्वर्या व अविनाश नारकर नेमके कोणता देश फिरायला गेलेत याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर अविनाश यांनी ‘व्हिएतनाम डायरिज’ असं कॅप्शन देत आपल्या परदेशवारीची खास झलक नेटकऱ्यांबरोबर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये दोघांच्या हातात पासपोर्ट, व्हिएतनाम येथील निसर्गरम्य ठिकाणं अन् नारकर कपलच्या हटके लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

स्पृहा जोशी, अश्विनी कासार, ईशा संजय , शरद पोंक्षे, सुकन्या मोने अशा अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत नारकर जोडप्याला ‘हॅप्पी जर्नी’ म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Avinash Narkar (@avinash.narkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, व्हिएतनाम ट्रिपची खास झलक सोशल मीडियावर शेअर करताना अविनाश नारकरांनी या पोस्टला स्नेह पोंक्षेच्या ‘बंजारा’ सिनेमातील गाणं लावलं आहे. “बंजाराच्या संपूर्ण टीमला खूप खूप मनापासून शुभेच्छा… १६ मे पासून ‘बंजारा’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय…!!” असं नारकरांनी कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. यावर ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘थँक्स मित्रांनो’ अशी कमेंट करत ऐश्वर्या व अविनाश नारकरांचे आभार मानले आहेत.