३१ मेला प्रदर्शित झालेला ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत आहे. शरण शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट संथ गतीने व्यवसाय करताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली आहेत. सोशल मीडियावर अनेकजण या गाण्यांवर डान्स करताना करताना दिसत आहेत. अशातच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप म्हणजेच नारकर जोडप्यांनी ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटातील रोमँटिक गाण्यावर डान्स केला आहे.

राजकुमार राव व जान्हवी कपूरच्या ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटातील ‘देखा तेनु पहली पहली बार’ या रोमँटिक गाण्याची अनेकांना भुरळी पडली आहे. शाहरुख खान, काजोलच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘शावा-शावा’ या गाण्याचं हे रीमेक आहे. गायक मोहम्मद फैजने ‘देखा तेनु पहली पहली बार’ गाणं गायलं आहे. या गाण्यावर ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकरांनी जबरदस्त डान्स केला आहे.

Aishwarya Narkar And Avinash Narkar again dance on sooseki song of pushpa 2 movie
Video: ‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर पुन्हा एकदा ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स, चाहत्यांची जिंकली मनं
Aishwarya narkar avinash narkar dance on south song netizen comments viral video
“नका करत जाऊ…”, ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरांच्या ‘या’ व्हिडीओवर नेटकऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला…
aishwarya and avinash narkar dances on navara hach hava song
“नवरा हाच हवा…”, अक्षरा-अधिपतीच्या गाण्यावर नारकर जोडप्याचा सुंदर डान्स! शिवानी रांगोळे कमेंट करत म्हणाली…
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
riteish deshmukh greets madhuri dixit
Video : अंबानींच्या समारंभात माधुरी दीक्षितला पाहताच रितेश देशमुखने केलं असं काही…; अभिनेत्याचं सर्वत्र होतंय कौतुक
Aishwarya narkar shared video with avinash narkar on special day of vatpoornima
“तरी नवरा हाच पाहिजे”, वटपौर्णिमेच्या निमित्ताने ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला पती अविनाश यांच्यासाठी खास व्हिडिओ
aishwarya and avinash narkar dances on devara film malayalam song
Video : नारकर जोडप्याचा मल्याळम गाण्यावर डान्स, सोबतीला होती ‘ही’ मराठी अभिनेत्री

हेही वाचा – ‘शुभविवाह’ मालिकेतून अचानक ‘या’ अभिनेत्याची एक्झिट, आता ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेता झळकला ‘या’ भूमिकेत

ऐश्वर्या नारकरांनी हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये दोघं ‘देखा तेनु पहली पहली बार’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत असून अविनाश नारकरांच्या एक्सप्रेशन्सने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. दोघांचा हा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: मुक्ता चॅलेंज करणार पूर्ण, सगळ्यांसमोर करणार सागरला किस, पाहा रोमँटिक सीन

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील कलाकारांचा गोविंदाच्या गाण्यावरील जबरदस्त डान्स, वल्लरी विराज म्हणाली, “वेडसर…”

विशेष म्हणजे या व्हिडीओतील ऐश्वर्या नारकरांच्या लूकने देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिव्हलेस ब्लाऊज, त्यावर हिरव्या रंगाची किनार असलेली काळ्या रंगाची साडी, केसात गजरा, कपाळावर मोठी टिकली, अशा सुंदर लूकमध्ये ऐश्वर्या नारकर पाहायला मिळत आहेत. नारकर जोडप्याच्या या व्हिडीओला आतापर्यंत ६९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून २ हजारांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. तसंच चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.