Aishwarya & Avinash Narkar Funny Video : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मराठी नाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये नारकर जोडप्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. सध्या या दोघांचे इन्स्टाग्राम रिल्स प्रचंड व्हायरल होत असतात.

ऐश्वर्या व अविनाश नारकर ट्रेंडिंग गाणी आणि ऑडिओ क्लिप्सवर रील्स व्हिडीओ बनवून प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात. या जोडप्याने पांडुरंग वाघमारे यांच्या व्हायरल मजेशीर ऑडिओवर नुकताच एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री घरातील झाडांवर पाणी शिंपडत असतात. इतक्यात मागून अविनाश नारकर त्यांच्यासाठी गजरा घेऊन येतात.

अविनाश नारकर त्यांना म्हणतात, “सुंदरे मी तुझ्यासाठी जीव देऊ शकतो” नवऱ्याचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्या थोड्या हसतात आणि म्हणतात, “जीव कोणीही देईल हो… तुम्ही माझ्याबरोबर जगून दाखवा” यानंतर अविनाश यांच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स एकदम बदलतात, बायकोचं उत्तर ऐकून त्यांची चांगलीच फजिती होते.

ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओला “नवरा-बायकोचं प्रेम” असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी या मजेशीर व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. विशेषत: अविनाश नारकरांच्या एक्स्प्रेशन्सचं भरभरून कौतुक केलं आहे. “सर तुमचे एक्स्प्रेशन्स कमाल आहेत”, “अविनाश सरांचे एक्स्प्रेशन्स एक नंबर”, “तुम्ही दोघंही कमाल आहात”, “लय भारी व्हिडीओ आहे”, “मस्त व्हिडीओ १०० पैकी १००”, “भन्नाट व्हिडीओ बनवलाय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अविनाश नारकरांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत आणि ‘पुरुष’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. तर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेनंतर नव्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये झळकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.