Aishwarya Narkar Son Amey Narkar : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे मराठी इंडस्ट्रीमधील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. घर, संसार सांभाळून सिनेविश्वात या दोघांनीही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या व अविनाश यांच्या एकुलत्या एक मुलाचं नाव अमेय नारकर असं आहे. अमेय सध्या त्याचं उच्च शिक्षण परदेशात पूर्ण करत आहे. भविष्यात त्याला मनोरंजनसृष्टीतच आपलं करिअर घडवायचं आहे.
अमेय नारकरचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याच्या गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमेय गेल्या काही वर्षांपासून लोकप्रिय अभिनेत्री ईशा संजयला डेट करत आहे. ‘झी मराठी’च्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेमुळे ईशा घराघरांत लोकप्रिय झाली आहे. यामध्ये ती सूर्या दादाच्या बहिणीची म्हणजेच राजश्री ( राजू ) ही भूमिका साकारत आहे.
ईशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या ‘आस्क मी सेशन’मध्ये अभिनेत्रीने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. ईशाने एका नेटकऱ्याला अमेय नारकरबरोबरचा फोटो शेअर करत, “अजून माझं लग्न झालं नाहीये कारण, कारण, कोणीतरी खूप दूर आहे सध्या” असं उत्तर दिलं होतं. यामुळे दोघंही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट झालं होतं. आज अमेयच्या वाढदिवसानिमित्त ईशाने एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त आहेत.
ईशा लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Mi Amor ( माय लव्ह ) तुझी रोज आठवण येतेय…आपली पुन्हा भेट केव्हा होईल…मी सध्या दिवस मोजतेय.” या पोस्टसह अभिनेत्रीने अमेयबरोबरचे पाच गोड फोटो देखील शेअर केले आहेत.
दरम्यान, अमेयने रुईया महाविद्यालयात त्याचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. यावेळी त्याने अनेक एकांकिका सादर केल्या आहेत. पुढे, त्याने त्याचं पदव्युत्तर पदवी ( MA ) पर्यंतचं शिक्षण देखील पूर्ण केलं. यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेय बाहेरगावी गेला, अशी माहिती ऐश्वर्या नारकरांनी मध्यंतरी आरपार मराठीच्या मुलाखतीत दिली होती.