‘जाऊ बाई गावात’ या ‘झी मराठी’वरील रिअ‍ॅलिटी शोला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच या कार्यक्रमात अभिनेता सागर कारंडेने पोस्टमन काकांच्या रुपात एन्ट्री घेतली होती. हा भाग प्रेक्षकांसाठी खूपच भावनिक ठरला. ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींना हजेरी लावली. परंतु, आता लवकरच या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक हार्दिक जोशीला ‘जाऊ बाई गावात’च्या टीमकडून एक खास सरप्राईज मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जाऊ बाई गावात’ कार्यक्रमात दर आठवड्याला स्पर्धकांना सरप्राईज देण्यासाठी नवनवीन पाहुणे येतात. पण, या आठवड्यात स्पर्धकांसह या शोचा सूत्रसंचालक हार्दिक जोशीला खास सरप्राईज मिळणार आहे. १४ तारखेला संपूर्ण देशभरात मकरसंक्रांत साजरी करण्यात येणार आहे. वर्षातील या पहिल्या सणाच्या निमित्ताने या कार्यक्रमात हार्दिकची पत्नी अक्षया देवधर हजेरी लावणार आहे.

हेही वाचा : “बायकोने ५ लाखांची FD मोडली अन्…”, अंशुमन विचारेने ‘असं’ घेतलं हक्काचं घर; म्हणाला, “बँकेचा हफ्ता…”

मकरसंक्रांतीला ‘जाऊ बाई गावात’ कार्यक्रमात पाठकबाई येणार आहेत. अक्षया देवधरने यासाठी संक्रांतीचा पारंपरिक लूक व काळी पैठणी साडी नेसली होती. तिळगुळाचा गोडवा आणि रंगीबेरंगी पतंगाची बहार घेऊन राणादाच्या पाठकबाई लवकरच या शोमध्ये येणार आहेत.

हेही वाचा : Video : भगरे गुरुजींच्या लेकीची ‘कलर्स मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री! शेअर केली पहिली झलक

अक्षयाच्या येण्याने हार्दिकसाठी ही संक्रांत नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे. दरम्यान, हार्दिक-अक्षयाबद्दल सांगायचं झालं, तर हे दोघेही ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे चर्चेत आले. यामध्ये दोघांनी राणादा व पाठकबाई या भूमिका साकारल्या होत्या. मालिकेने निरोप घेतल्यावर या दोघांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaya deodhar aka pathak bai guest appearance in hardeek joshi jau bai gavat show sva 00