Akshaya Deodhar Hardeek Joshi Wedding haldi ceremony dance video viral | Loksatta

Video: हळदी कार्यक्रमात बेभान होऊन नाचले राणादा-पाठकबाई, मित्रांनी उचलून घेतलं अन्…; अक्षया-हार्दिकचा डान्स व्हिडीओ व्हायरल

Akshaya Deodhar – Hardeek Joshi Wedding : हळदीच्या रंगात रंगले राणादा-पाठकबाई, अक्षया देवधर व हार्दिक जोशीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

Video: हळदी कार्यक्रमात बेभान होऊन नाचले राणादा-पाठकबाई, मित्रांनी उचलून घेतलं अन्…; अक्षया-हार्दिकचा डान्स व्हिडीओ व्हायरल
हार्दिक जोशी व अक्षया देवधर लग्नगाठ बांधणार आहेत. (फोटो: हार्दिक जोशी/ इन्स्टाग्राम)

Akshaya Deodhar – Hardeek Joshi Marriage: कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांची लगीनघाई सुरू आहे. अक्षया व हार्दिकच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. मेंहदी सोहळ्यातील फोटो व्हायरल झाल्यानंतर आता हार्दिक व अक्षयाच्या हळदी समारंभातील व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘राणादा-पाठकबाई’ ही ऑन स्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात २ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अक्षया-हार्दिकचा हळदी समारंभ नुकताच पार पडला. एकमेकांच्या रंगात रंगलेल्या अक्षया-हार्दिकने हळदी समारंभात डान्सही केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> अमिताभ बच्चन यांनी फेडलं होतं ९० कोटींचं कर्ज; परेश रावल ‘त्या’ प्रसंगाची आठवण करत म्हणाले…

हेही पाहा>> Photos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो

अक्षया-हार्दिकच्या हळदी समारंभासाठी खास पिवळ्या फुलांनी डेकोरेशन करण्यात आलं होतं. हळदीसाठी अक्षया व हार्दिकने पांढऱ्या रंगाचा पेहराव केला होता. मित्रपरिवार व कुटुंबियांच्या उपस्थितीत राणादा-पाठकबाईंचा हळदी समारंभ दणक्यात पार पडला. मित्रपरिवाराने अक्षया-हार्दिकला उचलून घेत डान्स करायला भाग पाडलं. अक्षया-हार्दिकच्या डान्सने हळदी समारंभात चार चांद लावले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा>> ‘दृश्यम २’ नंतर अजय देवगणच्या ‘सिंघम’ची चर्चा; चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

राणादा-पाठकबाईंच्या लग्नासाठी चाहतेही उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी खास अहा हा हॅशटॅगही तयार करण्यात आला आहे. हळदी समारंभाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 19:18 IST
Next Story
Video : …अन् लेकीला मिठी मारुन रडू लागले अक्षया देवधरचे वडील, राणादा-पाठकबाईंच्या हळदी कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल