अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी गेले अनेक दिवस चर्चेत आहेत. या चर्चांचं कारण म्हणजे त्यांचा विवाहसोहळा. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नगाठ बांधली. साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत त्यांच्या नात्याबद्दलचे सगळे अपडेट्स ते त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून देत होते. तर अजूनही अक्षया लग्नाच्या आठवणीत रमलेली दिसते. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये लग्नामध्ये तिची बऱ्याच वर्षांपासूनची एक इच्छा पूर्ण झाली असं तिने लिहिलं.

अक्षया आणि हार्दिकच्या विवाहसोहळ्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यांच्या लग्नाचं डेकोरेशन, त्यांचा लूक, लग्नात घेतलेला उखाणा, अक्षयाचं मंगळसूत्र या सगळ्याची जोरदार चर्चा झाली. तर लग्नानंतर अक्षया आणि हार्दिक यांनी एकत्र देवदर्शनही केलं. आता पुन्हा एकदा अक्षया एका पोस्टमधून तिच्या चाहत्यांना लग्नमंडपात घेऊन गेली आहे.

आणखी वाचा : स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या एका भागासाठी आकारतो ‘इतके’ मानधन, किंमत ऐकून व्हाल थक्क

अक्षयाने लग्न सोहळ्यातला तिचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोत ती मुहूर्ताच्या वेळी पिवळी साडी नेसून स्टेजवर येताना दिसतेय. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “मला मुहूर्ताच्या वेळी नेहमीच असा साधा आणि सुंदर लूक हवा होता.” आता तिचा हा फोटो आणि लूक चाहत्यांना आवडलेला असून या फोटोवर सगळेजण भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : Photos: लगीन घटिका समीप आली…देवधर आणि जोशी कुटुंबियांची ‘अशी’ सुरू आहे लगीन घाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षया आणि हार्दिक २ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत अगदी राजेशाही थाटात हा लग्नसोहळा पार पडला. त्याचबरोबर त्यांच्या लग्नात मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकारही आवर्जून उपस्थित होते.