Sussanne Khan Jasmin Bhasin : अभिनेता अली गोनी व अभिनेत्री जास्मिन भसीन ५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी आपलं नातं लपवून ठेवलं नाही. दोघेही एकत्र इव्हेंट्सला जातात, फिरायला जातात आणि फोटो व व्हिडीओही शेअर करतात. इतकंच नव्हे तर दोघेही एकमेकांबरोबर सण व उत्सव साजरे करतात. अनेकदा त्यांचे कुटुंबीयही त्यांच्याबरोबर असतात.

अली गोनी हा हार्दिक पंड्याची पूर्वाश्रमीची बायको नताशाचा एक्स बॉयफ्रेंड आहे. अलीचा चुलत भाऊ अर्सलान गोनी हृतिक रोशनच्या पहिल्या बायकोबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. अली व अर्सलानचे कुटुंबीय मूळचे जम्मूचे आहेत. बरेचदा ते कुटुंबाबरोबर सण व खास प्रसंग साजरे करतात. तेव्हा अली व अर्सलान यांच्याबरोबर सुझान व जास्मिन यांचीही भेट होते. अलीची गर्लफ्रेंड जास्मिनला सुझानबद्दल एका मुलाखतीत विचारण्यात आलं. तेव्हा सुझानच्या स्वभावाबद्दल जास्मिन काय म्हणाली, ते जाणून घेऊयात.

सुझानने हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खान हिला कुटुंब म्हटलं आहे. अली गोनी हा सुझानचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीचा चुलत भाऊ आहे. सुझान खान व अर्सलान गोनी रिलेशनशिपमध्ये आहेत. अली व अर्सलानच्या कुटुंबाचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे अनेकदा ते एकमेकांना भेटत असतात. या दोन्ही भावांमुळे जास्मिन व सुझानही एकमेकींना भेटतात आणि त्यांचा चांगला बाँड निर्माण झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुझानबद्दल बोलताना जास्मिन म्हणाली, “सुझानबरोबर माझं नातं खूप सुंदर आहे. कारण ती मला भेटलेली सर्वात नम्र, प्रेमळ आणि सर्वात सकारात्मक महिला आहे. माझे खूप मित्र आहेत आणि ते सर्व चांगले आहेत; पण सुझान ही खूप वेगळी खास आहे. तुम्ही तिच्याकडे एखाद्याबद्दल तक्रार केली तरी तिचे उत्तर सकारात्मक असते.”