मराठीसह बॉलीवूड चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेला गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात हृदयविकाराचा झटका आला. या कठीण प्रसंगातून तो मोठ्या जिद्दीने बाहेर आला आणि अवघ्या दोन महिन्यांत रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. या संपूर्ण काळात श्रेयसला त्याची पत्नी दीप्तीने खंबीरपणे साथ दिली. नुकताच श्रेयस महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

सध्या श्रेयसने ‘ही अनोखी गाठ’ चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. याशिवाय अलीकडेच पार पडलेल्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला दीप्ती आणि श्रेयसने एकत्र उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेता अमेय वाघने श्रेयससाठी एक भावुक कविता सादर केली. ही कविता ऐकून सगळ्याच प्रेक्षकांचे डोळे पाणावले.

हेही वाचा : “हृषिकेश रावांना भरवते…”, ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम जानकीने घेतला खास उखाणा, लवकरच सुरू होणार नवी मालिका

“संपले जरी श्वास तरी श्रेयस ते परत घेऊन येईल. श्वास जरी संपले तरी हात होता हाती… कारण, देवासोबत भांडत तिथे त्याची बायको उभी होती. देव म्हणाला जा परत…हिरो म्हणाला काय? आईच्या मनात मायेची, रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात ओढीची आणि बायकोच्या मनात साथीची अजून धडधड चालू आहे. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे….. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे.” अशी भावुक कविता अमेय वाघने सादर केली. ही कविता ऐकून श्रेयस, दीप्ती, वंदना गुप्ते यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले होते.

हेही वाचा : Video : समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती, नारळाच्या बागा अन्…; ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री गोव्यात करतेय धमाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यंदाच्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण १६ मार्च सायंकाळी झी मराठी वाहिनीवर करण्यात येणार आहे. सारा आली खान, शिल्पा शेट्टी या बॉलीवूड अभिनेत्रींनी देखील या कार्यक्रमाला खास उपस्थिती लावली होती.