झी युवा वाहिनीतर्फे ‘झी युवा सन्मान पुरस्कार २०२४’ देण्यात आले. या सोहळ्यात समाजातील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तरुणांना पुरस्कार दिले जातात. यावर्षीही विविध क्षेत्रांतील प्रयोगशील तरूणांना झी युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या यादीत राजकारणातील एक नाव आहे, ते म्हणजे अमित राज ठाकरे. पुरस्कार मिळाल्यावर अमित ठाकरे यांनी केलेल्या विधानाने लक्ष वेधलं आहे.

झी युवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात अमित ठाकरे यांनी एक वक्तव्य केले. वडील राज ठाकरे यांनी आपल्यासाठी अजूनही काय केलं नाही याबाबत अमित यांनी खंत व्यक्त केली आहे. अमित ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर जाणून घेऊयात की अमित यांनी नेमकं काय म्हटलं आहे.

मुंबईतील एका हुक्का पार्लरवर पोलिसांची छापेमारी, मुनव्वर फारुकीसह १४ जणांना घेतलेलं ताब्यात, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

अमित ठाकरे काय म्हणाले?

या कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे म्हणाले, “माझ्या वडिलांनी मला नेहमी प्रेरणा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. पण अजूनही त्यांनी माझ्यासाठी एक काम केलेलं नाही आणि ते म्हणजे मला एखादा कौतुकाचा मेसेज करणं. मी माझ्या वडिलांचा आदर करतो आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाचं पालन करतो. पण मला त्यांच्याकडून प्रोत्साहनाचा मेसेज मिळावा अशी माझी इच्छा आहे. कदाचित मी अजून कौतुक व्हावं असं काही केलं नसेल पण मी त्या दिवसाची वाट पाहीन.”

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं पाच दिवसांचं कलेक्शन १० कोटींहून कमी, जाणून घ्या एकूण आकडेवारी

अमित ठाकरेंच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी मनसेच्या विद्यार्थीसेनेच्या अध्यक्षपदापासून काम सुरू केलं. ते समाजातील तळागाळातील लोकांच्या व्यथा समजून घेत त्यांची मदत करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला असलेलं वलय अमित यांना वारसाने मिळालं असले तरी, आपल्या नेतृत्वगुण आणि वक्तृत्वशैलीने त्यांनी आपली युवानेते म्हणून ओळख निर्माण केली आहे. ‘झी युवा सन्मान पुरस्कार २०२४’ हा सोहळा रविवारी ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर प्रसारित होणार आहे.