Amitabh Bachchan Gets Emotional : अमिताभ बच्चन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये त्यांची क्रेझ कायम आहे. अशातच ‘कौन बनेगा करोडपती’च्या १७ व्या सीझनच्या नवीन भागात दृष्टीहिन मुलीचं वाक्य ऐकून ते भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

‘कौन बनेगा करोडपती १७’च्या नवीन भागात महिला आयएएस अधिकारी आयुषी यांनी सहभाग घेतला होता. त्यांना दृष्टी नसतानाही त्यांनी हा खेळ गाजवला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आयुषी यांनी यावेळी सांगितलं की, त्या एक आयएएस अधिकारी असून सध्या डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यावेळी असंही सांगितलं की, त्यांच्या कुटुंबातील अनेक जण त्यांना अमिताभ बच्चन यांच्या या कार्यक्रमाबद्दल सांगत असतात आणि त्या या कार्यक्रमाच्या फॅन आहेत.

अमिताभ बच्चन यांनी हे ऐकल्यानंतर त्यांचं कौतुक केलं. आयुषी यांनी यावेळी १३ प्रश्नांची उत्तरं देऊन २५ लाख रुपये इतकी रक्कम जिंकली; परंतु ५० लाख रुपयांच्या प्रश्नावेळी त्यांना उत्तर देता आलं नाही आणि हा खेळ सोडावा लागला.

आयुषी कार्यक्रमाबद्दल पुढे म्हणाल्या, त्या सुरुवातीपासून हा कार्यक्रम पाहत आल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय अनेकदा त्यांना या कार्यक्रमाचा सेट कसा आहे, तिथे कसे लायटिंग्स आहेत आणि अमिताभ बच्चन प्रत्येक स्पर्धकाला कशी चांगली वागणूक देतात याबद्दल सांगत असतात.

आयुषी पुढे अमिताभ बच्चन यांच्याबद्दल म्हणाल्या, “लोक नेहमी मला तुमच्याबद्दल सांगत असतात. तुम्ही किती उचं आहात, तुमचं व्यक्तिमत्त्व किती छान आहे आणि तुम्ही किती छान दिसता.” अमिताभ बच्चन हे ऐकल्यानंतर भावुक होताना दिसले. त्यांनी तिला सांगितलं की, “तुम्ही हा कार्यक्रम बघता ही आमच्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे आणि आम्ही भाग्यशाली आहोत की तुम्ही आमच्याबरोबर इथे आहात”.

दरम्यान, कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये अनेक जण सहभागी होत असतात आणि ते अनेकदा अमिताभ बच्चन यांचं कौतुक करताना दिसतात.