Bigg Boss Season 17 Grand Finale Updates: ‘बिग बॉस १७’चा विजेता घोषित होण्यासाठी अवघे काही मिनिटे बाकी राहिले आहेत. पण त्यापूर्वी या स्पर्धेतून अरुण माशेट्टी व अंकिता लोखंडे बाहेर झाले आहेत. आता फक्त मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार आणि मनारा चोप्रा हे तीन सदस्य राहिले आहेत. या तीन सदस्यांमधून कोण बाजी मारतंय? हे पाहणं उत्कंठवर्धक आहे. अशातच महाअंतिम सोहळ्यापूर्वी अंकिता लोखंडेला पाठिंबा देण्यासाठी शोमध्ये गेलेल्या अमृता खानविलकरने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’च्या स्पर्धेतून बाहेर येताच इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. स्टोरीमध्ये अंकिता लोखंडे बाहेर झाल्याचं वृत्त असून त्यावर अमृताने “हृदय तुटलं”, असं लिहिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंकिता लोखंडेनंतर ‘बिग बॉस १७’च्या स्पर्धेतून मनारा बाहेर झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता मुनव्वर फारुकी व अभिषेक कुमार यांच्यात चुरस रंगली आहे. काही वेळासाठी वोटिंग लाइन खुल्या झाल्या आहेत. आता मुनव्वर व अभिषेक या दोघांमधील कोण ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीवर नाव कोरतं? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.