‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अंकिता वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या घरी लग्नाआधीच्या विविध विधींना सुरुवात झाली आहे. नुकताच अंकिताचा साखरपुडा पार पडला. तिच्या साखरपुड्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साखरपुडा होण्याआधी अंकिताच्या मेंदीचेही काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.

सोशल मीडियावर सध्या सर्वत्र अंकिताच्याच लग्नाची चर्चा सुरू आहे. लग्नाआधीच्या विविध कार्यक्रमांच्या व्हिडीओसह अंकिताच्या वाढदिवसाचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. अंकिताने नुकताच तिच्या इन्स्टग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये सर्वांनी एकत्र येत, तिचा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसानिमित्त तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला एक खास गिफ्टसुद्धा दिले आहे.

अंकितासाठी कुणाल भगतने थेट एक सुंदर गाणे गायले आहे. कुणाल गाणे गात असतानाचा व्हिडीओ तिने स्टोरीमधून शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अंकिता तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन असल्याने नीट छानपणे सजली आहे. तिने लाल रंगाचा वनपीस घातला आहे. तसेच सिम्पल मेकअपसह लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावर एडी स्टोनमधील हिरव्या रंगाचे कानातले घातले आहेत.

अंकिताचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बिग बॉस फेम डीपीदादासुद्धा येथे आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, केक कापत असताना अंकिताला स्पेशल वाटावे म्हणून कुणाल गाणे गात आहे. त्याने यावेळी दिवंगत गायक किशोर कुमार यांचे एक ‘दूर गगन की छाँव में’ या चित्रपटातले गाणे गायले आहे. “आ चल के तुझे, मैं ले के चलूं”, या गाण्यातील काही सुंदर ओळी त्याने गायल्या आहेत.

अंकिता आणि कुणालचे लग्न केव्हा आहे?

१४ फेब्रुवारीला अंकिता आणि कुणाल या दोघांचा साखरपुडा पारपडला. त्यानंतर आता १५ फेब्रुवारीला म्हणजे आज अंकिताच्या हळदीचा कार्यक्रम आहे. तसेच उद्या म्हणजे १६ फेब्रुवारीला ती आणि कुणाल सात जन्मासाठी लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिताच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.

‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात झळकल्यानंतर अंकिताची लोकप्रियता फार वाढली आहे. अंकिता एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तसेच ती ‘सिंधुयोग’ची फाउंडर आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर कोकणी भाषेतील अनेक व्हिडीओ शेअर करीत ती चाहत्यांचे मनोरंजन करीत असते. अंकिता एखाद्या विषयावर तिचे मतही अगदी उघडपणे व्यक्त करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्या नवऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास तो मराठी सिनेविश्वात संगीत क्षेत्रात काम करतो. त्याने मराठीतील अनेक मालिकांना संगीत दिले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘येक नंबर’ या चित्रपटासाठी त्याने संगीत दिग्दर्शकही म्हणून काम केले आहे.