अंकुश चौधरी मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अंकुशसह त्याची पत्नीही कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दीपा परब चौधरी हिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांना आपलसं केलं. झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या निमित्ताने तिने बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. या मालिकेमधील ती साकारत असलेली गृहिणीची भूमिका सध्या चर्चेत आहे. दीपाने आता यादरम्यान आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Video : दीपिकाचा चालताना तोल गेला, चाहता सावरण्यासाठी हात पकडायला जाताच…; व्हायरल व्हिडीओमुळे अभिनेत्री ट्रोल

‘तू चाल पुढं’ मालिकेमध्ये दीपा एका गृहिणीची भूमिका साकारताना दिसत आहे. पण आता या मालिकेला नवं वळण मिळालं आहे. मालिकेत अश्विनीच्या (दीपा) नवऱ्याच्या हाती काम नसल्याने ती स्वतःच काम शोधण्यासाठी फिरत आहे.

यादरम्यानच एक प्रेरणादायी पोस्ट दीपाने शेअर केली. ती म्हणाली, “अश्विनीच्या स्वप्नांची नवी सुरुवात झाली आहे. ‘तू चाल पुढं’ मालिकेच्या आऊट डोअर शूटिंगदरम्यान गौरवी गुरुप्रसाद मलबारी ताईंना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी खऱ्या आयुष्यात स्वतःची खानावळ उघडण्याचं स्वप्न उराशी बाळगून ती उत्तमरित्या चालवत आहेत.”

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’मधील संजना रुग्णालयात दाखल, फोटो शेअर करत म्हणाली, “अशा प्रसंगांना फक्त हसत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अश्विनीची भूमिका साकारत असताना अशाप्रकारे वास्तविक आयुष्य जगणाऱ्या अश्विनीला बघून आपण करत असलेल्या कामाची कौतुकाची थाप पाठीवर पडते. त्याचं विलक्षण समाधान मिळतं. झी मराठीने ‘तू चाल पुढं’ मालिकेद्वारे अश्विनी साकारण्याची संधी आणि इतके गोड अनुभव मला दिले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.” दीपाने खानावळ चालवत असलेल्या अश्विनी यांच्याबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.