मराठी मालिकाविश्वात ‘अंतरपाट’ नावाच्या दोन मालिका होऊन गेल्या. काही वर्षांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘अंतरपाट’ नावाची मालिका गाजली होती. अभिनेत्री दीप्ती देवी आणि अभिनेता विकास पाटीलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अंतरपाट’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेतील सुलक्षणा आणि विठ्ठलची जोडी घराघरात पोहोचली होती. यानंतर अलीकडच्या काळात ‘अंतरपाट’ नावाची दुसरी मालिका ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळाली.

१० जूनपासून ‘अंतरपाट’ नावाची दुसरी मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू झाली होती. अभिनेत्री रश्मी अनपट व अभिनेता अशोक ढगे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री प्रतीक्षा शिवनकर, रेशम टिपणीस, संकेत कोर्लेकर, राजन ताम्हाणे, मिलिंद पाठक, ऋषीकेश वांबूरकर हे महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. अल्पावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण टीआरपीच्या अभावी ‘अंतरपाट’ मालिका अवघ्या अडीच महिन्यात बंद करावी लागली. याच मालिकेत झळकलेली अभिनेत्री रश्मी अनपट हिने पतीच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; केळवणाचे फोटो आले समोर

अभिनेत्री रश्मी अनपटच्या पतीचं नाव अमित खेडेकर असं आहे. अमित देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. ‘कन्यादान’ मालिका आणि ‘हिरकणी’ अशा बऱ्याच चित्रपटात त्याने काम केलं आहे. आज अमितचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने रश्मी अनपटने सुंदर पोस्ट लिहिली आहे.

रश्मीने अमितबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…तुझ्या स्मितहास्याने माझे जग उजळते आणि तुझ्या प्रेमाने माझे हृदय भरून येते. ढगाळ वातावरणातील तू माझा सूर्यप्रकाश आहेस आणि वादळातील तू माझी शांतता आहेस. तू माझा आहेस असं म्हणण यासाठी मी खूप नशीबवान आहे. आज आणि तुझा प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी मी येथे आहे. तुझ्यावर माझं अविरत प्रेम आहे, अमी…”

हेही वाचा – “गूड बाय यश अरुंधती देशमुख…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने लिहिली भलीमोठी भावुक पोस्ट, म्हणाला, “निरोप घेताना…”

हेही वाचा – न्यूझीलंड टू पुणे; ३२ ते ३६ तासांचा प्रवास केल्यानंतर गिरीजा ओकने बजावला मतदानाचा हक्क, म्हणाली, “मी ज्या विभागात राहते… “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रश्मी अनपटच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘अंतरपाट’ मालिकेपूर्वी ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’, ‘असावा सुंदर स्वप्नाचा बंगला’ या मालिकांमध्ये काम केलं होतं. तिची ‘असावा सुंदर स्वप्नाचा बंगला’ मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत रश्मीने मोठ्या ईश्वरीची भूमिका साकारली होती.