Anusha Dandekar Talks About Ex Boyfriend Karan Kundra : अनुषा दांडेकर लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर हिंदी, मराठी चित्रपटांत काम केलं आहे. अभिनेत्री हल्ली सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. व्यावसायिक आयुष्यासह ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. अशातच आता अभिनेत्रीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अनुषा दांडेकर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता करण कुंद्राला डेट करत होती. त्यांनी त्यादरम्यान एकत्र कामही केलं होतं. माध्यमांच्या वृत्तानुसार ते ५-६ वर्ष एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, २०२० मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. अनुषाने तिच्या युट्यूब चॅनेलवरील एका व्हिडीओमध्ये करणबरोबरच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला पहिलं कॅम्पेन मिळवण्यासाठी मदत केली होती, याबद्दल सांगितलं आहे.

अनुषा दांडेकरची एक्स बॉयफ्रेंडबद्दल प्रतिक्रिया

अनुषा करणच्या नावाचा उल्लेख न करता म्हणाली, “डेटिंग अ‍ॅपसंदर्भातील माझा अनुभव खूप वेगळा आहे. मी एक डेटिंग अ‍ॅपचे कॅम्पेन साइन केलेलं. त्यावेळच्या माझ्या बॉयफ्रेंडलाही मी या कॅम्पेनमध्ये सहभागी करून घेतलेलं. त्याला पहिल्यांदाच आयुष्यात एवढं मानधन मिळालेलं. पण, त्याने हेच डेटिंग अ‍ॅप वापरून इतर मुलींशी बोलणं आणि भेटणं सुरू केलं.”

अनुषा पुढे म्हणाली, “त्यावेळी आम्ही त्या कॅम्पेनसाठी एकत्र काम करणं अपेक्षित होतं, पण तो इतर मुलींबरोबर बोलायचा, त्यांना भेटायचा, ज्याबद्दल मला खूप उशिरा कळलं. तो अनेक मुलींबरोबर असायचा.”

करण कुंद्राने अद्याप यावर त्याची कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. सध्या तो अभिनेत्री तेजस्वी प्रकाशबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. २०२१ पासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत.