‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Aamchi Collector) या मालिकेची लोकप्रियता मोठी आहे. या मालिकेतील कलाकार त्यांच्या सहज अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनांवर राज्य करताना दिसतात. त्याबरोबरच ‘अप्पी आमची कलेक्टर’चे कथानकदेखील प्रेक्षकांना खिळवून ठेवते. अप्पी, अर्जुन, त्यांच्या संपू्र्ण कुटुंबीयांबरोबरच लहानगा अमोलही प्रेक्षकांना जिंकून घेताना दिसतो. काही दिवसांपासून अमोल आजाराचा सामना करीत असल्याचे दिसत आहे. अमोलवर उपचार सुरू असून, तो या आजारातून संपूर्णपणे बरा व्हावा, यासाठी अप्पी-अर्जुन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. अप्पी व अर्जुनचे पुन्हा एका लग्न व्हावे, अशी अमोलची इच्छा होती आणि ती इच्छा तो हट्ट करून पूर्ण करून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अमोलची साथ सुटणार?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अप्पी व अर्जुन यांचे लग्न सुरू आहे आणि दुसरीकडे अमोलवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. अप्पीचे वडील डॉक्टरला विनंती करीत म्हणतात, “डॉक्टर अमोलला काही होऊ देऊ नका. अमोल म्हणजे आमचा जीव आहे. अप्पी-अर्जुन फेरे घेत असताना त्यांना भास होतो की, अमोल तिथे आहे. तो त्या दोघांच्या हातावर हात ठेवत म्हणतो, “माँ-बाबा माझी इच्छा पूर्ण झाली. आता हे हात कधीच सोडायचे नाहीत.” त्यानंतर अप्पी व अर्जुन दोघे दवाखान्यात जात असल्याचे पाहायला मिळते. अमोलवर शस्त्रक्रिया सुरू असून, डॉक्टरांनी, कॉम्प्लिकेशन्स आहेत, असे म्हटल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “एकीकडे जुळणार अप्पी-अर्जुनची लग्नगाठ; दुसरीकडे सुटणार अमोलची साथ?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे अमोल हा घरातील सर्वांचा लाडका आहे. अप्पी व अर्जुन यांच्यातील दुरावा त्यानेच नाहीसा केला आहे. त्याबरोबरच कुटुंबालादेखील त्याने जोडले आहे. अमोलवर सर्वांचे खूप प्रेम आहे. त्याच्या आजारामुळे घरातील सर्व जण चिंतेत आहेत. अमोलच्याच हट्टासाठी अप्पी व अर्जुन पुन्हा एकदा लग्न करीत आहेत.

हेही वाचा: Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता अमोल या आजारातून बरा होणार की त्याची साथ सुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.