‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ही मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर कायम टिकून आहे. रेकॉर्ड ब्रेक टीआरपी देखील या मालिकेने केला आहे. त्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेची नेहमी चर्चा होतं असते.

हेही वाचा – Video: “महाराष्ट्रात जन्माला आलेला मारवाडी हा मराठी…” छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत जितेंद्र जोशीने सांगितली ‘मराठी’ची व्याख्या

लवकरच मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. चेहरा लपवून फिरत असलेली प्रतिमा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुभेदारांच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली पाहायला मिळणार आहे. पण त्यानंतर काय घडतं? हे येत्या काळात पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. लग्नानंतरचा सायली-अर्जुनचा हा पहिलाच पाडवा आहे. त्यामुळे दोघांसाठी हा पाडवा खास असणार आहे. दोघांनी नुकताच एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला आणि त्यावेळी सायली-अर्जुननी एकमेकांसाठी मजेशीर उखाणा घेतला.

हेही वाचा – दिवाळी पाडव्याला ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकार जुई गडकरीला देणार ‘हे’ खास गिफ्ट; अभिनेता अमित भानुशालीने केला खुलासा

View this post on Instagram

A post shared by Amit Bhanushali (@aamit.bhanushali)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायली म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी आणि अर्जुन म्हणजे अभिनेता अमित भानुशालीने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी दोघांना दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने खास उखाणा घ्यायला सांगितला. तेव्हा अमितने (अर्जुन) एक मजेशीर उखाणा घेतला. अमित म्हणाला, “दिवाळी आहे तर फराळ आणि मनातल्या आनंदाचा नाही ठाम ठिकाणा, सायली तुला कम्पलीट सूट देतो जा प्रियाला हाण हाण हाणा…” हे ऐकून जुई खूप हसू लागते. त्यानंतर जुई (सायली) देखील मजेशीर उखाणा घेतं म्हणते, “दिवाळी आहे, नाही फराळ आणि आनंदाचा ठाम ठिकाण… तुम्ही म्हणालात तन्वीला हाण हाण हाणा… मी तर तयार आहे, अर्जुन सर तुम्ही फक्त हो म्हणा.”