‘बिग बॉस १६’ शोचा ग्रँड फिनाले अवघ्या दोन दिवसांवर आहे. आता या घरामध्ये फक्त पाच सदस्य उरले आहेत. प्रियांका चौधरी, एमसी स्टॅन, शालीन भानोत, शिव ठाकरे, अर्चना गौतम यांच्यामध्ये ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी चढाओढ सुरू आहे. तर देशभरातून मराठमोळ्या शिवलाही प्रेक्षक, चाहत्यांचा भरभरुन पाठिंबा मिळत आहे. मराठी कलाकारही शिवला वोट करा असं म्हणत आहेत.

आणखी वाचा – राखी सावंतच्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा ‘बिग बॉस १६’च्या सदस्याशी आहे संबंध, ‘त्या’ व्हायरल फोटोंनंतर सोशल मीडियावर चर्चा

दरम्यान अभिनेता आरोह वेलणकरनेही शिवबाबत एक ट्वीट केलं. शिवला वोट करा असं सांगणारं हे ट्वीट आहे. त्याचबरोबरीने त्याने म्हटलं की, “माझे याच्याबरोबर मतभेद असतील पण मराठी माणसाला वोट करा. चला करा वोट. वोटिंग लाईन चावून काढा.” आरोहच्या या ट्विटवरुन त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये आरोह व शिव एकत्र होते. यावेळी एका टास्कदरम्यान दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. शिव आरोहला चावला असल्याची तेव्हा जोरदार चर्चा रंगली. अजूनही या दोघांमध्ये मैत्री झालेली नाही. तरीही आरोहने केलेलं ट्वीट हे शिवसाठी टोमणा आहे का? असं नेटकरी विचारत आहेत.

आणखी वाचा – आदिल खानच्या पहिल्या पत्नीचा राखी सावंतला फोन, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुझी लाज वाटते, शिव व त्याची टीम तुझं वोटही घेणार नाही खोटा माणूस, शिवला बदनाम करायचा प्रयत्न केला आणि आता वोट करतो, वोट करा ट्वीट केलंस पण पुढे असं बोलायची गरज नव्हती, तुझ्या वोटची शिव ठाकरेला गरज नाही, मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.