कामाव्यतिरिक्त सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असणारे अभिनेते म्हणजे अविनाश नारकर. ९०च्या दशकापासून मराठी सिनेसृष्टीत सक्रिय असणारे अविनाश नारकर यांच्या अभिनयाचा चाहता वर्ग जितका जास्त आहे, तितकाच सोशल मीडियावरही आहे. अविनाश यांनी पन्नाशी ओलांडली असली तरीही त्यांची एनर्जी, तारुण्य हे तरुणाईला लाजेवलं असं आहे. नुकतीच अविनाश यांनी सासऱ्यांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून आहे.

अविनाश नारकरांनी सासऱ्यांबरोबर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या मागे त्यांनी ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ हे गाणं लावलं आहे. या फोटोमध्ये अविनाश व त्यांचे सासरे हसताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत अविनाश यांनी सासऱ्यांसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – “मी मातोश्रीवर गेलेलो…”, अभिजीत सावंतने बाळासाहेबांच्या भेटीचा सांगितला किस्सा, म्हणाला, “उद्धव ठाकरेंनी मला…”

अविनाश यांनी लिहिलं आहे, “ज्यांनी माझं अख्खं आयुष्य…माझं संपूर्ण जगणं सर्वार्थाने ऐश्वर्यसंपन्न केलं त्या या माझ्या सासरेबुवांचे…निर्मळ मनाच्या बाबांचे उपकार खरंच साता जन्मात फेडू शकणार नाही मी…” अभिनेत्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय ऐश्वर्या नारकरांनी ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

हेही वाचा – Video: “पाण्यात ताज ताज म्हावरं…”, ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ सोहळ्यात तेजश्री प्रधानने घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ आला समोर

हेही वाचा – Video : आदित्य आणि पारू देणार प्रीतमच्या प्रेमाला साथ पण…; नेमकं काय घडणार? पाहा नवा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ऐश्वर्या नारकरांची पोस्ट

दरम्यान, अविनाश नारकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी त्यांची ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ मालिका ऑफ एअर झाली. या मालिकेतील त्यांनी वडिलांची भूमिका साकारली होती. अडीच वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेनंतर अविनाश ‘डंका हरी नामाचा’ चित्रपटात झळकले. हा चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अविनाश नारकरांसह अभिनेता अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, रसिका सुनिल, अक्षया गुरव झळकले होते. आता लवकरच ते एका मराठी वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहेत. ‘देवाक काळजी २’ असं या वेब सीरिजचं नाव असून उद्या याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.