Avika Gor Gets Engaged: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अविका गौर ही तिच्या नवनवीन भूमिकांमुळे चर्चेत असते. ‘बालिका वधू’ या मालिकेतून अभिनेत्री घराघरांत पोहोचली होती. आता मात्र ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

अविका गौर व बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानी यांचा साखरपुडा पार पडला आहे. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. अविका अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यांच्या नात्याची चर्चादेखील झाली.

आता अविकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते दोघेही पारंपारिक वेशभूषेत दिसत आहेत. तसेच दोघेही आनंदी असल्याचे दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना अविकाने लिहिले, “त्याने मला लग्नासाठी विचारले. मी हसले, रडले त्यानंतर मी होकार दिला. हा माझ्या आयुष्यातील सर्वात सोपा होकार होता.”

पुढे अविकाने असेही लिहिले की मी खूप फिल्मी आहे. बॅकग्राऊंडला म्युझिक वाजत होते. तो शांत आहे, तर्कशुद्धपणे बोलतो. मी काहीतरी ड्रामा व्हावा असा विचार करते आणि तो ते सांभाळून घेतो. असेच आम्ही एकमेकांसाठी योग्य आहोत.

जेव्हा त्याने मला लग्नासाठी विचारले तेव्हा माझ्यातील नायिका जागी झाली. हात हवेत असल्यासारखे वाटत होते, डोळ्यात अश्रू येत होते आणि मनात कोणताही विचार उरला नाही.” अविकाने हे सर्व जादूसारखे आहे, असे लिहित साखरपुडा झाल्याचे जाहीर केले आहे.

अविकाच्या या पोस्टवर मिलिंद चंदवानीने कमेंट करत लिहिले, “माझे हृदयाची धडधड वाढली होती, हे खरे बॅकग्राऊंड म्युझिक होते. तू हो म्हणालीस आणि अचानक प्रत्येक फिल्मी वाक्य अर्थपूर्ण वाटू लागले. तू ड्रामा करतेस, मी दिग्दर्शक आहेस, आपण दोघे मिळून सर्वोत्तम चित्रपट बनवू.”

अविका गौर आणि मिलिंद यांनी २०२० मध्ये डेट करण्यास सुरू केली. सुमारे ५ वर्षे डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे, अविकाने आधीच अनेक मुलाखतींमध्ये तिच्या लग्नाच्या कल्पनांबद्दल सांगितले आहे. अविका गौरच्या टीव्ही मालिकांबरोबरच दक्षिण आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.