देशभरात सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी भव्य देखावे उभारले आहेत. गेली दोन वर्ष सण समारंभ आपण साध्या पद्धतीने साजरे केले होते. मात्र यंदाच्या वर्षी उत्साहाचे वातावरण आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार देवीच्या मंडळांना भेटी देत आहेत. बॉलीवूड सेलिब्रेटी दुर्गा पूजेच्या कार्य्रक्रमात सहभागी होत आहेत. टीव्ही, मालिकेतील कलाकारदेखील अनेक ठिकाणी फिरत आहेत. प्रसिद्ध मालिका ‘भाभीजी घर पे हैं’ कलाकारांनी दिल्लीमधील रामलीला कार्यक्रमाला हजेरी लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मालिकेत ‘नारायण मिश्रा’ हे पात्र साकारणारा अभिनेता असिफ शेख, ‘अनिता मिश्रा’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव या दोघांनी दिल्लीमधील प्रसिद्ध अशा ‘रामलीला’ कार्य्रक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला आलेल्या या कलाकारांचे स्वागत मोठ्या उत्सहाने करण्यात आले. रामायणातील कथांचे सुंदररित्या सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर अभिनेता आसिफ शेख म्हणाला ‘रामलीला पाहण्यासाठी आलेले लोक उत्तम प्रेक्षक होते. त्यांच्यामध्ये उत्साह प्रचंड होता. रामलीला हा असा एक कार्यक्रम आहे जिथे देशातील लाखो लोक एकत्र येतात. यंदाचा उत्सव भव्य आणि आकर्षक होता’.

“माझी भूमिका तुम्हाला… ” आदिपुरुष चित्रपटातील भूमिकेबद्दल क्रिती सेनॉनची स्पष्ट प्रतिक्रिया

अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव या कार्यक्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया देताना म्हणाली ‘हा कार्यक्रम नेत्रदीपक होता. तसेच माझ्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता. रामलीला कार्यक्रमाला हजेरी लावायची माझी खूप इच्छा होती राम-लीला हा सर्वात भव्य कार्यक्रमांपैकी एक आहे आणि अशा अद्भुत कृतीचा साक्षीदार होण्याचा थरार खूप सुंदर आणि संस्मरणीय होता. सर्वात चांगला भाग म्हणजे असिफजींबरोबर स्टेजवर धमाल करता आली तसेच प्रेक्षकांबरोबर संवाद साधता आला’.

‘भाभीजी घर पे हैं’ ही लोकप्रिय मालिका &tv या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता प्रसारित होते. या मालिकेतील कलाकार दीपेश भान यांचे नुकतेच आहे. असिफ शेख हा अभिनेता गेली अनेकवर्ष चित्रपट, मालिका क्षेत्रात कार्यरत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhabiji ghar par hai stars aasif sheikh and vidisha srivastava attend delhis famous ramlila at lal quila spg
First published on: 04-10-2022 at 19:10 IST