झी मराठी वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेत भुताची भूमिका करून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सरिता मेहेंदळे हिने एक आनंदाची बातमी दिली आहे. सरिता आई झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून बाळाच्या जन्माबाबत माहिती दिली आहे.

अभिनेत्री सरिता मेहेंदळेने दोन महिन्यांपूर्वी पोस्ट शेअर करत चाहत्यांबरोबर गुडन्यूज शेअर केली होती. आता सरिताने गोंडस बाळाला नववर्षाच्या दिवशीच जन्म दिला आहे. सरिताला मुलगा झाला आहे. तिला १ जानेवारी २०२४ रोजी मुलगा झाला. तिने ‘इट्स अ बॉय’ लिहिलेला एक फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये बाळाच्या जन्माची तारीख लिहिली आहे.

सैफ अली खानने अवघ्या २१ व्या वर्षी अमृता सिंहशी लग्न का केलं होतं? आता तिच्याशी कसं नातं आहे? उत्तर देत म्हणाला…

बाळाच्या जन्मानंतर सरिता व तिचे पती सौरभ जोशी खूप आनंदी आहेत. लग्नानंतर पाच वर्षांनी ते पालक झाले आहेत. सरिताच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सरिता आई झाली आहे, त्यासाठी सर्वजण तिच्या पोस्टवर कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सरिताने आजवर अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. ‘कन्यादान’, ‘सरस्वती’ या तिच्या लोकप्रिय मालिका होत्या. इतकंच नाही तर तिने अमोल कोल्हे यांच्याबरोबर ‘अर्धसत्य’ या नाटकातही काम केलं होतं. ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेत तिने मोहनच्या मागे असलेली हडळ मधुवंतीचे पात्र साकारले होते.