कॉमेडी क्वीन भारती सिंहने मनोरंजनविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. लाफ्टर क्वीन म्हणून ओळख मिळवलेली भारती सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. भारती व हर्ष लिंबाचिया यांचा लेक लक्षचा पहिला वाढदिवस नुकताच पार पडला. त्याच्या वाढदिवसाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

भारती व हर्ष लिंबाचिया लेकाला लाडाने गोला असं म्हणतात. गोलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या पापाराझी पेजवरुन त्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये भारती व हर्ष लाडक्या लेकाबरोबर दिसत आहेत. भारतीने “हर हर शंभो” असं म्हणताच गोलाने हात वर केल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर “जय श्री कृष्णा” म्हणाल्यानंतर त्याने हात जोडल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

हेही वाचा>> सलमान खानच्या ‘त्या’ फोटोवर एक्स गर्लफ्रेंडची कमेंट, चाहते म्हणाले “पहिलं प्रेम…”

हेही वाचा>> परिणीता चोप्रा-राघव चड्ढा यांची लगीनघाई! दिल्लीत सुरू आहे साखरपुड्याची जय्यत तयारी

गोलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. “हा भोला नाही गोला आहे” असं अनेकांनी म्हटलं आहे. गोला क्युट असल्याच्या कमेंटही केल्या आहेत. चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत गोलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलं का? लंडनमधून घेतले आहेत अभिनयाचे धडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनोदाची उत्तम जाण असणाऱ्या भारतीने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पाच वर्षांनी ३ एप्रिल २०२२ रोजी त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.